Pune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात

लॉकडाऊनच्या काळात आधीच आर्थिक कंबरड मोडलं असताना आता प्रवाशांअभावी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएल पैशाअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे

Pune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 11:40 PM

पुणे : पुण्याची लाईफलाइन म्हणून पीएमपीएमएल बससेवेला ओळखलं जातं (PMPML Bus Service). लॉकडाऊनच्या काळात आधीच आर्थिक कंबरड मोडलं असताना आता प्रवाशांअभावी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएल पैशाअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे (PMPML Bus Service).

पुणेकरांची लाईफलाइन म्हणून या पीएमपीएमएल बससेवेकडे पाहिलं जातं. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करण्यात आले. मात्र, ते काही साध्य झाले नाही. त्यानंतर कोरोनाच्या संकटात बंद पडलेली वाहतूक सेवा यामुळे पीएमपीएमएलच्या बसची चाक पंक्चर होण्याची वेळ आली. कारण, 2 मार्चपासून पुणे महानगरपालिका आणि पिपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून तब्बल 183 कोटी रुपये येणं बाकी आहे.

दोन्ही महापालिकांना कोरोनाच्या काळात बस आणि कर्मचारी देण्यात आले. त्यापोटी एकही पैसा मिळालेला नाही. त्यामुळे बस चालविणे कठीण झाले आहे. इंधन, वेतन तसेच आरोग्य योजनांसाठी पैसे नाहीत. सुमारे 90 कोटी रुपयांचे देणे आहे (PMPML Bus Service).

रोख पैशांशिवाय डिझेल मिळत नाही. एमएनजीएल कंपनीने सीएनजीचे 40 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास गॅसपुरवठा थांबविण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे आतापर्यंत वेळेवर पगार होत असलेल्या कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून पगारासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची वेळ आली आहे.

पुणे महानगरपालिकेने मात्र पीएमपीएमएलची कुठलीही थकबाकी नसल्याचा दावा केला आहे. गेल्यावर्षीची संचलन तूट ही पालिकेने आधीच दिलेली आहे. या वर्षीची संचालन तूट पुढच्या वर्षी दिली जाते, असं सांगत राज्य सरकारने आता पीएमपीएमएलला आर्थिक मदत करण्याची गरज आहे, असं सांगत महापौरानी आपली जबाबदारी झटकली आहे.

PMPML Bus Service

संबंधित बातम्या :

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

पुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.