पुणेकरांनो भाजी, किराणा सामान आणायला चालत जा, दुचाकीचा वापर टाळा, पोलिसांचे आवाहन

पुण्यात अनेक जण भाजीपाला खरेदीसाठी दुचाकी किंवा वाहनाचा (Pune police appeal not use vehicle) वापर करतात.

पुणेकरांनो भाजी, किराणा सामान आणायला चालत जा, दुचाकीचा वापर टाळा, पोलिसांचे आवाहन
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 6:53 PM

पुणे : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Pune police appeal not use vehicle) आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरण्यास सर्वांना मज्जाव करण्यात आला आहे. मात्र तरीही हजारो तरुण रस्त्यावर फिरत असतात. पुण्यात गेल्या चार दिवसांपासून रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

पुण्यात अनेक जण भाजीपाला खरेदीसाठी दुचाकी किंवा वाहनाचा (Pune police appeal not use vehicle) वापर करतात. मात्र पुणेकरांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी किंवा किराणा दुकानाजवळ चालत जावे. दुचाकी किंवा वाहनाचा वापर करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुणे शहरात तब्बल 121 ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. तर लॉकडाऊननंतर 23 मार्चपासून पुण्यात कलम 188 अतंर्गत 1 हजार 896 जणांवर कारवाई केली आहे. तर आतापर्यंत 12 हजार 500 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या कालावधीत तब्बल 4 हजार 500 वाहनं जप्त करण्यात आली आहेत, अशी सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबतची माहिती दिली.

त्याशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांना ताकीद देण्यात येत आहे. तसेच काहींना समज देऊन टप्प्याने वाहने परत केली आहेत. काल ( 1 एप्रिल) शहरात 188 कलमातंर्गत 382 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 1 हजार 587 मोकाट फिरणाऱ्यांना नोटीस दिली आहे.

तसेच जर रस्त्यावर फिरणाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न आल्यासा त्यांच्यावर कलम 188 अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर 1 हजार 287 वाहने जप्त केली (Pune police appeal not use vehicle) आहेत.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चारशेच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 416 वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत 17 जणांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.