पुण्यात वाहनबंदीच्या हालचाली, पोलिस प्रशासन मोठ्या निर्णयाच्या तयारीत
कोरोनाचा वाढता विळखा वेळीच आटोक्यात आणण्यासाठी पुण्यात वाहन प्रवासावर बंदी आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. (Pune Car Travel ban Corona)
पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत असल्यामुळे वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे उद्देश सफल होत नसल्याने पोलिस प्रशासन अखेर शहरात वाहनबंदी लागू करण्याचा विचार करत आहे. (Pune Car Travel ban Corona)
आवश्यक वाहतूक वगळून सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. पुण्यात सकाळी बहुतांश वाहने बाहेर आल्याने, दुपारनंतर वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ असते. कोरोनाचा वाढता विळखा वेळीच आटोक्यात आणण्यासाठी वाहन प्रवासावर बंदी आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे नागरिक घरी बसतील, अशी आशा आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बंद
जमावबंदीमुळे सर्व सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर टोल नाक्यावर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. यात सर्वाधिक खासगी वाहन आहेत.
Corona | वेल्हा परिसरातील तब्बल 26 गावं क्वारंटाईन, महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी
पुण्यात ‘कोरोना’चा विळखा वाढत असल्याचं चित्र आहे. परदेशी न जाताच पुण्यातील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आल्यामुळे चार नातेवाईकही बाधित झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव (कम्युनिटी स्प्रेड) सुरु झाल्याच्या शक्यतेला बळ मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. (Pune Car Travel ban Corona)
Corona | राज-उद्धव यांचं फोनवरुन बोलणं, मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांची एक सूचनाhttps://t.co/mq2UXkRS3g @dineshdukhande
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2020
पुण्यात परदेशी प्रवास न केलेल्या किंवा त्यांच्याशी थेट संपर्क न आलेल्या 41 वर्षे महिलेला व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दिल्लीतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येऊन माहिती घेतली आहे
संबंधित महिला वेल्हा तालुक्यातील असल्याने अख्खं गाव क्वारंटाईन केलं आहेच, शिवाय खबरदारी म्हणून आजूबाजूची तब्बल 26 गावंही क्वारंटाईन करण्यात आली. या गावामध्ये येण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.
Pune Car Travel ban Corona