Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lockdown | लॉकडाऊन संपल्यावर राज्य सरकारचे निर्देश 31 जुलैपर्यंत कायम : पुणे जिल्हाधिकारी

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसते. सध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

Pune Lockdown | लॉकडाऊन संपल्यावर राज्य सरकारचे निर्देश 31 जुलैपर्यंत कायम : पुणे जिल्हाधिकारी
Pune Lockdown
Follow us
| Updated on: Jul 23, 2020 | 5:38 PM

पुणे : पुण्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा आज (23 जुलै) अखेरचा दिवस आहे. मात्र लॉकडाऊन संपत असला तरी गर्दी नियंत्रणासाठी विशेषतः शनिवार-रविवारबाबत प्रतिबंध लावण्याचा प्रशासनाचा विचार आहे. नवीन नियमावलीबद्दल पालिका आयुक्त घोषणा करतील. (Pune post lockdown rules and guidelines to be released)

राज्य सरकारचे निर्देश 31 जुलैपर्यंत कायम आहेत. त्या निर्देशांनुसार उद्यापासून परिस्थिती कायम राहील. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी असलेले P1 P2 चे नियम दुकानांना लागू राहतील, कोणताही वेगळा आदेश काढला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुण्यातील दहा दिवसांचा लॉकडाऊन गुरुवारी मध्यरात्री संपणार आहे. नियमितपणे ठरवून दिलेल्या वेळेत शुक्रवारपासून व्यवहार सुरु राहतील. परंतु आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसते. बाजारपेठ आणि लग्न समारंभातही गर्दी होते, सध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे शिष्टमंडळ आज याच संदर्भात महापालिका आयुक्तांना भेटणार आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर नेमके काय काय प्रतिबंध असतील, यावर सविस्तर चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुण्यात शुक्रवारपासून नवीन काय नियमावली असेल, याबाबत पालिका आयुक्त घोषणा करतील.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पुणे व्यापारी महासंघाने वेळ वाढवून देण्याची मागणी यापूर्वी केली होती. त्याचबरोबर सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यासही विरोध केला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पुण्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन होता, मात्र दुसऱ्या टप्प्यात 19 तारखेपासून शिथिलता देण्यात आली होती.

दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत खरेदीसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परंतु इतक्या दिवसांनी आलेली शिथिलता आणि ‘गटारी’ याचा योग जुळल्याने पुणेकरांनी मोठी झुंबड केली होती.

लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसात पुण्यात तब्बल 14 हजार 109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, या दरम्यान पुण्यात 230 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे

पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे 63 हजार 351 कोरोना रुग्ण आहेत. तर 22 हजार 484 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत 1 हजार 514 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 799 बेफिकीर पुणेकरांवर कारवाई

पुण्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन, तरीही 14 हजार 109 नव्या रुग्णांची भर

(Pune post lockdown rules and guidelines to be released)

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.