दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही? पुण्याच्या रहिवाशाचं आयुक्तांना पत्र

पुण्यातच पोलिसांनी मिशन ‘ऑल आऊट’ हाती घेत मॉर्निंग वॉकच्या नावाखाली बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिक्षा देऊन घरी पिटाळलं होतं.  (Pune Residents demands to allow Morning Walk during Corona Lockdown)

दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही? पुण्याच्या रहिवाशाचं आयुक्तांना पत्र
रात्री जेवणानंतर चालणे आरोग्यासाठी लाभ, जाणून घ्या काय काय आहेत फायदे
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 5:47 PM

पुणे : दारु विक्रीला परवानगी दिली जाते, मग आरोग्यास आवश्यक असणाऱ्या मॉर्निंग वॉकला का नाही? असा सवाल उपस्थित करत पुण्याचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना पत्र लिहिलं आहे. (Pune Residents demands to allow Morning Walk during Corona Lockdown)

पुण्यात ‘कोरोना’चा संसर्ग कमी असणाऱ्या परिसरात मॉर्निंग वॉकला परवानगी देण्याची मागणी सजग नागरीक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून आणि तोंडाला मास्क लावून मॉर्निंग वॉकला करण्याच्या सूचना द्याव्यात असं ते म्हणतात.

काय आहे पत्र?

सकाळच्या फ्रेश हवेत व्यायाम म्हणून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनासुध्दा social distancing पाळण्याच्या आणि मास्क बांधण्याच्या अटींवर परवानगी देणे आवश्यक आहे. कोरोनाला बळी पडणाऱ्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब इत्यादी रोग असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना डॉक्टर रोज सकाळी मोकळ्या हवेत तासभर फिरण्याचा व्यायाम करायला सांगतात, जे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक आहे. एकीकडे आरोग्याला घातक ठरणारी दारु आठ तास विकायची आणि विकत घ्यायची सोय करण्यात आली असताना आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक तासाच्या मॉर्निंग वॉकवर मात्र बंदी कायम ठेवणे चुकीचे आणि अतार्किक आहे.

वेलणकर यांच्या मागणीला उत्तर मिळणार का, याकडे लॉकडाऊनच्या काळातही मॉर्निंग वॉकची हौस बाळगणाऱ्या पुण्यातील नागरिकांचं लक्ष आहे.

देशभरात अनेक जणांनी लॉकडाऊनच्या काळातही मॉर्निंग वॉक करण्याचा आगाऊपणा केला होता. त्यापैकी काही जणांवर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. पुण्यातच पोलिसांनी मिशन ‘ऑल आऊट’ हाती घेत मॉर्निंग वॉकच्या नावाखाली बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिक्षा देऊन घरी पिटाळलं होतं.

दारुच्या दुकानांबाहेर रांगा कायम

राज्यभरात दारु खरेदीसाठी दुकानांबाहेर आजही रांगा लागल्या आहेत. पुण्यात दारु घेण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी मद्यपींच्या वाईन शॉपसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या. दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत दिसले. यावेळी महिलाही वाईन शॉपच्या रांगेत उभी असल्याचं दिसलं.

हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये मित्रांसोबत मार्निंग वॉकची हौस, नवी मुंबईत भाजप नगरसेवकावर गुन्हा

मद्य विक्रेत्यांनी सोमवारच्या गोंधळानंतर संरक्षक उपाययोजना राबवल्या आहेत. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानासमोर गोलाकार वर्तुळ करण्यात आलं, तर काही ठिकाणी बांबूचे बॅरिकेट्स लावले आहेत. इतकंच नाही तर गर्दी नियंत्रणासाठी काही ठिकाणी बाउन्सरही तैनात होते. (Pune Residents demands to allow Morning Walk during Corona Lockdown)

हेही वाचा : पुणे पोलिसांचं मिशन ‘ऑल आऊट’, मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरणाऱ्या ‘मच्छरां’वर कारवाई

कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या पुणे शहराच्या 97% भागात काही प्रमाणात शिथीलता आहे. त्याचबरोबर दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अटी आणि शर्थीनुसार परवानगी देण्यात आली. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या. सकाळपासूनच रांगा पाहायला मिळत होत्या. तर प्रत्येक ग्राहकाचं ओळखपत्र, नाव नोंदणी करुनच त्याला पेट्रोल दिलं जात आहे. सोशल डिस्टन्स ठेवूनच ग्राहकही इंधन भरत होते.

पुणे जिल्ह्यात सोमवारी 71 नवे ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 2 हजार 122 वर गेली आहे. पुणे शहरात कोरोनाचे 1 हजार 878 रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या 

भवानी पेठेत चारशेपार कोरोनाग्रस्त, ढोले पाटील रोडवर 314 रुग्ण, पुण्यात कोणत्या प्रभागात किती? 

पुण्यात हॉटस्पॉट वगळता इतरत्र अंशतः शिथिलता, प्रत्येक रस्त्यावर दहा दुकानं उघडणार 

दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत, महिलाही वाईनसाठी लाईनमध्ये

(Pune Residents demands to allow Morning Walk during Corona Lockdown)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.