Pune RTO | पुणे जिल्ह्यात सोमवारपासून आरटीओ सुरु, कंटेनमेंट झोनमधील नवीन गाड्यांची नोंदणी होणार नाही

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत आरटीओ सुरु होणार आहे. सोमवारपासून नवीन वाहनांची नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

Pune RTO | पुणे जिल्ह्यात सोमवारपासून आरटीओ सुरु, कंटेनमेंट झोनमधील नवीन गाड्यांची नोंदणी होणार नाही
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 11:21 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारपासून आरटीओ म्हणजे प्रादेशिक (Pune RTO Starts) परिवहन विभागाचे कार्यालय सुरु होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत आरटीओ सुरु होणार आहे. सोमवारपासून नवीन वाहनांची नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. वाहन मालकांना नंबर (Pune RTO Starts) दिला जाणार आहे.

आरटीओ कार्यालयातील इतर कामकाज संदर्भात आराखडा तयार करण्यात येणार आहे. वाहन परवाना, जुन्या गाड्यांची खरेदी विक्री, हस्तांतरण यासंदर्भात नियोजन करुन आराखडा तयार केला जाणार. किती कर्मचारी कामावर येणार, कंटेनमेंट झोन कोणकोणते आहेत. नाव नोंदणीसाठी नागरिकांना कशा पद्धतीने बोलवायचं यासह इतर बाबींचा आराखडा तयार केला जाणार आहे. ‌

कंटेनमेंट झोनमधील डीलरच्या नवीन गाड्यांची नाव नोंदणी होणार नाही. कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणच्या डीलरच्या नवीन गाड्यांची नाव नोंदणी (Pune RTO Starts) होईल.

यापूर्वी रोज सहाशे ते सातशे वाहनांची नोंदणी होत होती मात्र आता सध्या किती वाहनांची नोंद होते याबाबत अनिश्चितता आहे. लॉकडाऊनमुळं अनेक जणांना वाहनाची नाव नोंदणी करता आली नाही. अनेकांना वाहन नंबर मिळाला मात्र रजिस्ट्रेशन झालं नव्हतं. मात्र आता या वाहन मालकांना नाव नोंदणी करता येणार आहे‌‌.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 33 हजारांच्या पार

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 33  हजारांच्या पार पोहोचला आहे. आज राज्यात सर्वाधिक 2 हजार 347 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 053 वर पोहोचली आहे. राज्यात आज कोरोनाने 63 बळी घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींचा आकडा 1 हजार 198 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढवला

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे. लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.

Pune RTO Starts

संबंधित बातम्या :

Pimpari Corona | पिंपरीत चिमुकली भावंडे कोरोनामुक्त, दीड महिन्याच्या बाळासह चार वर्षांच्या दादाकडून ‘फाईट’

ससून रुग्णालयात तिघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 185 वर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर, बॅकलॉग परीक्षेचाही निर्णय

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.