पुण्यात कामगारांसाठी 214 शेल्टर होम, खाण्या-पिण्यासह वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी
बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी पुणे विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली (Pune Shelter Home For Workers) आहेत.
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Pune Shelter Home For Workers) करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी पुणे विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात 64 हजार 926 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबतची माहिती दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत बेघर झालेले नागरिक, विस्थापित तसेच परराज्यातील (Pune Shelter Home For Workers) अनेक कामगार अडकले आहेत. त्यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य आणि भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने अडकलेल्यांसाठी तसेच बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत.
पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 42 निवारागृहे ( 12 हजार 460 नागरिक), सातारा जिल्ह्यात 143 निवारागृहे (4 हजार 688 नागरिक), सांगली जिल्ह्यात 16 निवारागृहे (1 हजार 306 नागरिक), सोलापूर जिल्ह्यात 2 निवारागृहे,(62 नागरिक) कोल्हापूर जिल्ह्यात 11 निवारागृहे ( 46 हजार 410 नागरिक) एकूण 64 हजार 926 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था पुणे विभागात करण्यात आली आहे.
बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ.म्हैसेकर यांनी दिली.
जमावबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांनी आहे त्याच ठिकाणी थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहात रहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले (Pune Shelter Home For Workers) आहे.