पुण्यातील प्रतिबंधित भागात निर्बंध अधिक कडक, भाजीपाला विक्रेत्यांनाही बंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रतिबंधित भागात आता अधिक कडक बंधने (Pune Strict restrictions in hotspots) लागू करण्यात येणार आहे.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रतिबंधित भागात आता अधिक कडक बंधने (Pune Strict restrictions in hotspots) लागू करण्यात येणार आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांना घराबाहेरच पडू दिलं जाणार नाही. लॉकडाऊन 4 मध्येही ही बंधने कायम राहणार आहेत. यासंदर्भात पुणे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे कडक नियोजन सुरु आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी जीवनाश्यक साहित्य घरात आणून ठेवावे लागणार आहे. (Pune Strict restrictions in hotspots)
वाचा : पुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटिव्ह
सध्या गल्लीबोळात पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे. प्रतिबंधित भागात भाजीपाला आणि अन्य विक्रेत्यांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पुण्यातील रुग्णसंख्या वाढतीच
पुणे जिल्ह्यामध्ये 12 तासात 62 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 3629 बाधित रुग्ण तर 186 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीपर्यंत 21 कोरोना तर मध्यरात्रीनंतर 41 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे एका रात्रीत तब्बल 62 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाल्याचं समोर आलं.
दुसरीकडे पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवसात 141 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा काल 3567 वर पोहोचला होता. त्यामध्ये मध्यरात्री वाढ होऊन आकडा 3600 च्या वर गेला.
Pune Strict restrictions in hotspots
संबंधित बातम्या
Corona : पुणे 141, कोल्हापूर 7, औरंगाबाद 30, एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ