Pune Lockdown | पुण्यात सोमवारपासून घाऊक औषध विक्री सुरु, औषध विक्रीबाबत नियमावली जारी

औषध विक्री संदर्भात असोसिएशनची नियमावली तयार करण्यात आली आहे. याअंतर्गत कोरोनाबाधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Pune Lockdown | पुण्यात सोमवारपासून घाऊक औषध विक्री सुरु, औषध विक्रीबाबत नियमावली जारी
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 4:39 PM

पुणे : पुण्यात सोमवारपासून (18 मे) घाऊक औषध विक्री सुरु (Wholesale Medicine Sale) होणार आहे. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिकने हा निर्णय घेतला आहे. औषध विक्री संदर्भात असोसिएशनची नियमावली तयार करण्यात आली आहे. याअंतर्गत कोरोनाबाधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी (Wholesale Medicine Sale) देण्यात येणार आहे.

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिकने पुण्यात सोमवारपासून घाऊक औषध विक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. घाऊक विक्रेत्याला कोरोना झाल्याने शुक्रवारपासून घाऊक विक्री बंद होती. औषध विक्री संदर्भात मेडिकल असोसिएशन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियमावली बनवली आहे.

नियम काय?

  • कोरोना प्रादुर्भाव असलेल्या भागातील कर्मचाऱ्याला तात्पुरते कामावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
  • कर्मचाऱ्याला पगारी सुट्टी देण्यात येणार आहे.
  • प्रत्येक कर्मचाऱ्यांचे तापमान नोंद केले जाणार आहे.
  • ऑक्सिमीटरच्या माध्यमातून रक्तातील ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात येणार आहे.
  • कर्मचाऱ्यांना पूर्वीसारखंच मास्क आणि सॅनीटायझर वापरण्यास बंधनकारक राहील.
  • घाऊक औषध विक्रीच्या दुकानात काउंटरवर कोणतीही औषध विक्री होणार नाही.

सेंटर पार्क, नेहरू स्टेडियम आणि कृष्ण सुंदर पार्कमधून औषधांची (Wholesale Medicine Sale) डिलिव्हरी केली जाणार आहे. या ठिकाणाहून किरकोळ मेडिकल दुकानदारांना डिलिव्हरी केली जाईल. मागणीनुसार मेडिकल ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी देण्याचा विक्रेत्यांचा प्रयत्न आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 3,795 वर

पुणे जिल्ह्यात काल (16 मे) एकाच दिवसात तब्बल 228 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 795 वर पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे आतार्यंत 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 1952 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. काल दिवसभरात पुण्यात 73 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढवला

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे. लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाचे किती रुग्ण?

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज 1 हजार 606 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात आतापर्यंत सर्वाधिक 67 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Wholesale Medicine Sale

संबंधित बातम्या :

Gold Purchase | दुकाने सुरु होताच बारामतीकरांची सराफा दुकानात गर्दी, एकाच दिवसात 30000000 रुपयांची सोने खरेदी

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर, 24 तासात 32 पॉझिटिव्ह, कुठे किती रुग्ण?

पुण्यातील प्रतिबंधित भागात निर्बंध अधिक कडक, भाजीपाला विक्रेत्यांनाही बंदी

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढताच, बाधितांचा आकडा 3,795 वर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.