पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात गणेश उत्सवा संदर्भात काटेकोर नियमावली ठरवण्यात आली आहे (Rules for Ganeshotsav in Pune).
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात गणेश उत्सवा संदर्भात काटेकोर नियमावली ठरवण्यात आली आहे (Rules for Ganeshotsav in Pune). गणेश मंडळांच्या बैठकीत सर्वांची मतं आणि सूचना जाणून घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही नियमावली बनवली आहे. या बैठकीतील निर्णयाप्रमाणे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीस मनाई करण्यात आली. त्याचबरोबर बाप्पासाठी मांडव उभारण्यासही मनाई करण्यात आली आहे. याशिवाय देखावे सादर करण्यास आणि गर्दी जमवण्यासह मनाई करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या या बैठकीत गणेश मंडळांनीही प्रशासकीय यंत्रणांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. उत्सवाच्या बाबतीत कुणासोबतही दूजाभाव होऊ नये, शहरातील सर्व मंडळांसाठी सारखेच नियम असावेत, अशी मागणी या गणेश मंडळांनी केली. तसेच सर्वांना नियम सारखे असतील तरच सर्व गणेश मंडळांचे सहकार्य लाभेल, असं मत मंडळाच्यावतीने मांडण्यात आलं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन केलंय. यंदा गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी शक्यतो कुठल्याच प्रकारचे मांडव उभारु नयेत. गणेश मंडळांनी मंदिरातच श्रींची प्रतिष्ठापना करावी, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलंय.
यंदा रस्त्यांवर गणपती मंडळांना श्रींची प्रतिष्ठापना करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिर नसलेल्या मंडळांना मूर्ती ठेवत असलेल्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात पुण्यातील सर्व मंडळांना सारखेच नियम असावेत अशी अपेक्षा उपस्थित गणेश मंडळांनी व्यक्त केलीय. त्यामुळे प्रशासनापुढे सर्व गणेश मंडळांकडून नियम पाळले जाण्यासाठी सज्ज राहण्याचं आव्हान असणार आहे.
हेही वाचा :
नवी मुंबईत चार महिन्यांनी मॉल सुरु, एका दिवसात बंद
आधी नवनीत राणा, आता रवी राणांना कोरोना संसर्ग, कुटुंबातील एकूण 12 जण बाधित
लॉकडाऊन हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरुन कायदा हाती घेऊ : प्रकाश आंबेडकर
Rules for Ganeshotsav in Pune