उदयनराजेंचा पराभव निश्चित, सुप्रिया सुळे लाखाने हरतील : संजय काकडे

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामतीत, तर उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात जवळपास एक लाख मतांनी पराभव होईल, अशी आकडेवारी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सादर केली. सुप्रिया सुळेंचा पराभव होईलच, शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना महायुतीचे सर्व 10 उमेदवार निवडून येतील, असा अंदाज काकडेंनी व्यक्त केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. संजय […]

उदयनराजेंचा पराभव निश्चित, सुप्रिया सुळे लाखाने हरतील : संजय काकडे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामतीत, तर उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात जवळपास एक लाख मतांनी पराभव होईल, अशी आकडेवारी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सादर केली. सुप्रिया सुळेंचा पराभव होईलच, शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना महायुतीचे सर्व 10 उमेदवार निवडून येतील, असा अंदाज काकडेंनी व्यक्त केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

संजय काकडे यांची आणि पुण्यातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची भेट झाली. गिरीश बापट यांनी संजय काकडे यांच्या घरी जाऊन चाय पे चर्चा केली.

त्यानंतर संजय काकडे म्हणाले, “पुणे आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येतील. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला नक्कीच हादरा बसेल. इतकंच नाही तर बारामतीतून सुप्रिया सुळेंचा 1 लाख मताधिक्याने पराभव होईल”

पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे आमची ताकद आणखी वाढली आहे.  बारामतीत कांचन कुल यांच्याबाबत वातावरण अनुकूल आहे. याशिवाय खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड मतदारसंघातून भाजपला आघाडी मिळेल. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा परभाव निश्चित होईल, असा दावा संजय काकडेंनी केला.

पुणे लोकसभा मतदारसंघात मी प्रचार करणार आहे. माझी जबाबदारी मी क्षमतेने पूर्ण केली. त्याचे निकाल सर्वांसमोर आहेत. गिरीश बापटांसोबत प्रचारासंदर्भात सविस्तर चर्चा झाली, असं काकडेंनी सांगितलं.

केवळ पुणेच नाही तर बारामती आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे, असं काकडे म्हणाले.

उदयनराजेंना लोक वैतागले

यावेळी काकडे म्हणाले, “माढ्यात आम्हाला विजयसिंह पाटलांमुळे ताकद मिळेल, ती जागा आम्ही जिंकूच. शिवाय  कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक निवडून येतील. शिवाय आश्चर्य वाटेल की उदयनराजे हे सुद्धा एक ते दीड लाखाने पराभूत होतील. कारण उदयनराजेंना लोक वैतागले आहेत”

उदयनराजेंना स्थानिक लोक कंटाळले आहेत. जिल्हा परिषदेला त्यांनी 40 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी केवळ 3 जागा आल्या, त्यामुळे साताऱ्याची जागा यावेळी नक्कीच आम्ही जिंकणार असं काकडे म्हणाले.

आमच्या 9 जागांचा विजय निश्चित आहे, केवळ एक जागा ती बारामतीची आहे, त्यासाठी आम्ही जोर लावत आहे, त्या जागेवरही विजय निश्चितच मिळेल, असा विश्वास काकडेंनी व्यक्त केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.