पुण्यात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रोबो, एका क्लिकवर जेवण-पाण्यासह इतर गोष्टी मिळणार

पुण्यात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी आता रोबो दाखल करण्यात आला (Pune Robot for Corona Care) आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रोबो, एका क्लिकवर जेवण-पाण्यासह इतर गोष्टी मिळणार
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 5:31 PM

पुणे : महाराष्ट्राचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची (Pune Robot for Corona Care) संख्या वाढत चालली आहे. मुंबई-पुण्यात कोरोनाचा उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सला कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी आता रोबो दाखल करण्यात आला आहे. हा रोबो रुग्णाच्या बेडपर्यंत त्याला जेवण, नाश्ता, पाणी, औषध या सर्व गोष्टी देणार आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई रुग्णालयात रोबो सध्या (Pune Robot for Corona Care) कार्यरत आहे. हा रोबो 50 मीटर ते 70 मीटरच्या अंतरावर रिमोटच्या मदतीने काम करतो. एका बटणाच्या क्लिकवर हा रोबो कोरोना पेशंटच्या बेडपर्यंत जेवण, पाण्याची बॉटल, औषधे इत्यादी वस्तू घेऊन जातो. दररोज दिवसातून किमान दोन किंवा तीन तास हा रोबो काम करतो.

मात्र हा रोबो येण्यापूर्वी अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना पाण्याची बॉटल, औषध घेऊन रुग्णाकडे जावं लागतं होतं. यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये दोन ते तीन कर्मचाऱ्यांची गरज भासायची. मात्र या रोबोमुळे एकाचवेळी 20 ते 25 किलो जेवण, नाश्ता आणि औषधं नेण्याची सोय झाली आहे. या रोबोसाठी 45 ते 50 हजारांचा खर्च आला.

दरम्यान टेली रोबटच्या माध्यमातून डायरेक्ट सूचना देता येतील का? या संदर्भात संशोधन सुरु आहे. त्यानंतर आणखी रोबो तयार करण्याचे नियोजन केले जाणार आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

पुणे शहरात काल दिवसभरात 122 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1339 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात 79 कोरोनाग्रस्त रुग्ण दगावले आहेत. 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 73 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ॲक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (Pune Robot for Corona Care) संख्या 1057 आहे.

संबंधित बातम्या : 

गुड न्यूज! पुण्यात चार महिन्याच्या चिमुरड्याची कोरोनावर मात

कसबा-विश्रामबाग वाडा परिसरात 20 नवे रुग्ण, भवानी पेठेत संख्या 263 वर, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.