पुण्यात 54 जणांना कोरोनांचा संसर्ग, मरकजमध्ये सहभागी झालेल्यांची शोधाशोध सुरुच
कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी जगभरात काळजी वातावरण आहे. पुण्यातही आता कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 54 वर पोहचली आहे (Total Corona patient in Pune).
पुणे : कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी जगभरात काळजी वातावरण आहे. पुण्यातही आता कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 54 वर पोहचली आहे (Total Corona patient in Pune). विशेष म्हणजे मरकजवाल्यांची पहिली यादी पुणे महानगरपालिकेला मिळाली आहे. यातील 55 नागरिकांचा शोध लागला असून त्यातील एक जण कोरोनाबाधित आहे, तर दोघांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशी माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. काही लोकांनी लपवालपवी केल्यानं कोरोना संसर्गाची संख्या वाढली. आता यापुढे या रुग्णांची संख्या वाढणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनापा आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, “पुण्यात सध्या कोरोना व्हायरसचे 45 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 54 रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातील काही उपचारानंतर बरे झाले आहेत. मनपाला आता मरकजला हजेरी लावलेल्यांची यादी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यातील 55 नागरिकांशी संपर्क साधण्यात आला आहे. यातील काही रुग्ण पॉझिटिव्ह असून 2 लोकांना होमक्वारंटाईन करण्यात आलं आहे. सुरुवातीला काही लोकांना लपवालपवी केली. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येऊन कोरोना संसर्गाची संख्या वाढली. येथून पुढे कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही.”
कोरोना व्हायरस रुग्णांवर नायडू रुग्णालयात उपचार केले जातात. त्यामुळं नायडू रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मिस्ट चेंबर उभारला आहे. जवळपास 3 लाख रुपये किमतीचा हा मिस्ट चेंबर आहे. या माध्यमातून कोणत्याही माणसाच्या पूर्ण शरिराचं सॅनिटायझेशन केलं जातं. हे ऑटोमॅटिक असून एक माणूस गोलाकार फिरल्यास 20 सेकंदांमध्ये सॅनिटायझेशन होतं. या चेंबरमध्ये सोडिअम हायपो क्लोराईड कमी प्रमाणात वापरलं जात आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं, असंही गायकवाड यांनी सांगितलं.
पीएमपीच्या 3 बसमध्ये फिरतं ‘सॅनिटायझर चेंबर’, 20 सेकंदात पूर्ण सॅनिटायझेशन करणार
अशाच पद्धतीने शहरात आता फिरते सॅनिटायझर सुरु करण्यात येणार आहे. पीएमपीच्या 3 बसमध्ये हे मोबाईल सॅनिटायझर कार्यन्वित करण्याचं काम सुरु आहे. येत्या काही दिवसांमध्ये पुणेकरांसाठी ते उपलब्ध होणार आहे. मार्केट यार्ड, स्मशानभूमी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी हे सॅनिटायझर चेंबर उपलब्ध असेल. अशा बसमध्ये 20 सेकंदात पूर्ण सॅनिटायझेशन होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?
- मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
- मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
- मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
- मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
- नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
- मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
- बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
- मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
- पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
- मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
- मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
- पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
- जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
- मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
- मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
- मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
- मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
- पुणे : 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
- वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
- बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
- मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
- मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
- अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
Total Corona patient in Pune