Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर!

पुणे महानगरपालिका महापौर निवडणुकीला (PMC Mayor Election) ट्विस्ट मिळाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने 'महासेनाआघाडी'ने एन्ट्री केली आहे.

पुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर!
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: Nov 18, 2019 | 12:42 PM

पुणे : पुणे महानगरपालिका महापौर निवडणुकीला (PMC Mayor Election) ट्विस्ट मिळाला आहे. आता निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने ‘महासेनाआघाडी’ने एन्ट्री केली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय गणितांचा परिणाम पुण्यातही झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून पुण्याच्या महापौरपदासाठी (PMC Mayor Election) मुरलीधर मोहोळ (BJP Murlidhar Mohol) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

भाजपने उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पुणे महापौर पदासाठी प्रकाश कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आज आपला अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत महासेनाआघाडी तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच भाजप नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचाही दावा राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केला आहे.

आज सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ भाजपच्यावतीने अर्ज दाखल करतील. महापौरपदासाठी 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

भाजपकडून महापौरपदासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पुणे महापालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षांसाठी खुल्या सर्वसाधारण वर्गासाठी झाले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली होती. त्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये मोठी चढाओढ दिसून आली. त्यामुळे महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार या विषयी उत्सुकता शिगेला गेली होती. अखेर भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पुण्यासह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 13 नोव्हेंबरला मुंबईत काढण्यात आली. त्यात पुणे महापालिकेचे महापौरपदासाठी खुल्या सर्वसाधारण वर्गाचं आरक्षण निघालं. त्यामुळे सत्ताधारी भाजपमधून महापौरपदासाठी कुणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा होती. पालिकेत भाजपची तब्बल 99 नगरसेवकांसह एकहाती सत्ता आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही मोठी आहे. मात्र, या पदावर भाजपकडून अनुभवी नगरसेवकालाच संधी मिळणार असल्याचे बोललं जात होतं.

सुरुवातीपासूनच भाजपमधील अनुभवी नगरसेवकांमध्ये प्रामुख्याने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळे यांचं नाव महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. विधानसभा निवडणूकीत कोथरुड मतदारसंघातून निवडणूकीची जोरदार तयारी केलेल्या मोहोळ यांना ऐनवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे महापौरपदाच्या माध्यमातून त्याची भरपाई होणार असं आधीपासून बोललं जात होतं. याशिवाय अन्य इच्छुकांमध्ये नगरसेवक हेमंत रासणे, श्रीनाथ भिमाले, वर्षा तापकीर, श्रीकांत जगताप, धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर आदींची नावेही चर्चेत होती.

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असली तरी पक्ष ठरवेल त्यालाच महापौर पदावर संधी देण्यात येईल, असं भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. तसेच महापौर पदावरून भाजपमध्ये कोणाचीही नाराजी नसल्याचंही सांगण्यात आलं होतं.

अडीच वर्षांमध्ये पुन्हा खुल्या गटाला संधी

मागील टर्ममध्ये म्हणजेच 2015 मध्ये महापौरपदासाठी खुल्या सर्वसाधारण गटाचे आरक्षण निघाले. त्यावेळी दत्ता धनकवडे आणि प्रशांत जगताप यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर खुल्या महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले. त्यात मुक्ता टिळकांना महापौरपदाची संधी मिळाली. आता मागासवर्ग अथवा इतर मागासवर्गाचे आरक्षण निघण्याची शक्यता असताना पुन्हा खुल्या गटाचे आरक्षण निघाले आहे. दरम्यान विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांची तीन महिन्यांची वाढीव मुदत येत्या 21 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक 22 नोव्हेंबरला होणार असल्याचं महापालिकेने नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला जाईन असंही पारखी यांनी सांगितलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.