हत्यार घेऊन TikTok व्हिडीओ काढण्याचा आगाऊपणा, पुण्यात तरुणावर गुन्हा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुन्हेगारांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. नागपूर आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हेगारांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातील एका गुन्हेगाराने टीक टॉक व्हिडीओ तयार केला आहे. दीपक आबा दाखले असे या तरुणाचे नाव असून त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने परिसरात […]

हत्यार घेऊन TikTok व्हिडीओ काढण्याचा आगाऊपणा, पुण्यात तरुणावर गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुन्हेगारांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. नागपूर आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हेगारांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातील एका गुन्हेगाराने टीक टॉक व्हिडीओ तयार केला आहे. दीपक आबा दाखले असे या तरुणाचे नाव असून त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने परिसरात दहशत पसरवण्यासाठी टीक टॉक अॅपद्वारे एक व्हिडीओ तयार केला. यात त्याने ‘वाढीव दिसतंय राव…’ या लावणीवर व्हिडीओ तयार केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत दहशत निर्माण करण्यासाठी दीपकने हातात कोयत्यासारखं धारदार शस्त्रही ठेवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पिंपरी परिसरात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.

वाकड पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागल्यानंतर त्यांनी दीपकवर गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराभोवती सापळा रचत त्याला नुकतंच अटक केली. यानंतर त्याच्याकडून संबंधित शस्त्र जप्त करण्यात आलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपूर आणि औरंगाबादमधील कुख्यात गुन्हेगाराने TikTok व्हिडीओ बनवत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. गुन्हेगारांनी बनवलेले हे TikTok व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारांच्या या टीक टॉक व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या 

भायssss दुआ में याद रखना, औरंगाबादेत भाई गॅंगच्या गुंडांचा TikTok व्हिडीओ

VIDEO : नागपुरात कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ  

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.