मुख्यमंत्र्यांची लेट एण्ट्री, पवारांसह दिग्गज नेते ताटकळत, हर्षवर्धन पाटील-अजित पवारांच्या तासभर गप्पा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात आज एकाच मंचावर आहेत. मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूमध्ये (Vasantdada sugar institute awards) सर्वोकृष्ट साखर कारखाना पुरस्कार वितरण सोहळा आहे.

मुख्यमंत्र्यांची लेट एण्ट्री, पवारांसह दिग्गज नेते ताटकळत, हर्षवर्धन पाटील-अजित पवारांच्या तासभर गप्पा
Follow us
| Updated on: Dec 25, 2019 | 11:50 AM

पुणे :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात आज एकाच मंचावर आहेत. मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूमध्ये (Vasantdada sugar institute awards) सर्वोकृष्ट साखर कारखाना पुरस्कार वितरण सोहळा आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थित आहेत.  दौंड शुगरला यंदाचा सर्वोकृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार मिळाला आहे. (Vasantdada sugar institute awards)

वसंतदादा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गव्हर्निंग कौन्सिल मंडळाची बैठक झाली.  अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, रोहित पवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि कारखान्यांचे अध्यक्ष यावेळी हजर होते.

या पुरस्कार सोहळ्यासाठी मंचावर शरद पवार, रोहित पवार, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, हर्षवर्धन पाटील उपस्थित आहेत. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जवळपास अर्धा तास उशिरा पोहोचले.  शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व नेते हे मुख्यमंत्र्यांची वाट पाहात मंचावर उपस्थित होते. मुख्यमंत्री पोहोचेपर्यंत विविध राजकीय व्यक्तींच्या गप्पा रंगल्या.

हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांची चर्चा

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने एक वेगळं चित्र मंचावर पाहायला मिळालं. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कट्टर विरोधक अजित पवार यांच्यात जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गप्पा सुरु होत्या. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा राज्याने पाहिला होता.

लोकसभेत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊनही, राष्ट्रवादीने विधानसभेला इंदापूरची जागा सोडली नसल्याचा आरोप करत, हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवारांची चर्चा

दुसरीकडे शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील या दोघांमध्येही विविध विषयांवर गप्पा रंगल्या. विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून फारकत घेत, त्यांनी भाजपशी जवळीक केली.  मात्र आजच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याही गप्पा सुरु होत्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.