कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘मदतीचा आणि प्रेमाचा गुणाकार’, पुण्यात इंजिनिअर-डॉक्टर तरुणांकडून ‘रिलीफ पुणे’ मोहिम

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेलं असताना हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना या सर्व परिस्थितीत अनेक आव्हांनाना तोंड द्यावे लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यात तरुण इंजिनिअर्स आणि डॉक्टर्सने पुढाकार घेतला आहे (Digital platform Relief Pune to help poor amid lockdown).

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात 'मदतीचा आणि प्रेमाचा गुणाकार', पुण्यात इंजिनिअर-डॉक्टर तरुणांकडून 'रिलीफ पुणे' मोहिम
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 12:37 AM

पुणे : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेलं असताना हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना या सर्व परिस्थितीत अनेक आव्हांनाना तोंड द्यावे लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यात तरुण इंजिनिअर्स आणि डॉक्टर्सने पुढाकार घेतला आहे (Digital platform Relief Pune to help poor amid lockdown). एकिकडे कोरोना विषाणू संसर्गाचा गुणाकार करण्याचा प्रयत्न करत असताना हे तरुण गरिब कुटुंबांसाठी मदतीचा आणि प्रेमाचा गुणाकार करत आहेत. या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आधार देत आहेत. या तरुणांनी पुणे-पिंपरी-चिंचवडमधील कोरोना मदतकार्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करत ‘रिलीफ पुणे’ नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे 200 हून अधिक मदतकार्यांची माहिती व संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गरजूंपर्यंत पोहचून मदतकार्य करणारे, देणगीदार, गरजू लोक आणि अडचणीत सापडलेले सर्वसामान्य लोक या सर्वांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. मदतीचा गुणाकार होण्यासाठी या सर्वांना एकमेकांशी जोडणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश असल्याचं मत या इंजिनिअर आणि डॉक्टर तरुणांनी सांगितलं.

रिलीफ पुणेने या उपक्रमाची माहिती देताना सांगितलं, “कोरोनाच्या जागतिक साथीचा सामना करण्यासाठी भारत 24 मार्च, 2020 पासून लॉकडाउनमध्ये आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन आणि ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ आवश्यक आहेत. मात्र अपेक्षेप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात आयटी, उत्पादन, करमणूक, पर्यटन, वाहतूक, बांधकाम, शिक्षण क्षेत्र, तसेच छोटे व्यावसायिक यांना मोठा फटका बसला आहे. यापैकी ज्यांना शक्य आहे ते वर्क फ्रॉम होम करत आहेत. मात्र ज्यांना वर्क फ्रॉम होमची सोय नाही, उत्पन्नाची हमी नाही आणि बचतीचे संरक्षण नाही त्यांचे रोजचे जगणेच कठीण होत आहे.”

फोटो सौजन्य : साद फाऊंडेशन

“घरकाम करणारे, रोजंदारीवरचे मजूर, स्थलांतरित मजूर, बेघर, कचरावेचक, सेक्स वर्कर्स, तृतीयपंथी यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसलेले विद्यार्थी, खानावळीत जेवणारे नोकरदार यांचा अगदी जेवणासाठीही संघर्ष सुरु आहे. ज्येष्ठ नागरिक किराणा आणि औषधे मिळणे कठीण होत आहे. कोरोनाशी संबंध नसलेले इतर आजार असणारे रुग्ण, गरोदर स्त्रिया यांना दवाखान्यापर्यंत पोचणे कठीण व असुरक्षित झाले आहे. लॉकडाऊनमध्ये घरी अडकलेले अनेकजण निराश होत आहेत, त्यांना समुपदेशनाची गरज आहे. आघाडीवर ही लढाई लढणारे डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी, कचरावेचक यांना पीपीईची गरज आहे. एकूणच आपण कधीही कल्पना केली नसेल अशा परिस्थितीत येऊन आपण पोहचलो आहोत.”

एकूण अशी परिस्थिती असली तरी असामान्य परिस्थितीला लोकांनी दिलेला प्रतिसाद सुद्धा असामान्य आहे. अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करण्यास शासन-प्रशासन, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, राजकीय पक्ष, डॉक्टर-केमिस्ट-मेकॅनिक यांच्या संघटना, हॉटेल मालक, किराणा दुकानदार, शेतकरी गट, सर्वसामान्य व्यक्ती आपापल्या परीने उतरले आहेत. ज्यांना प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहचून मदत करणे शक्य नाही. ते वैयक्तिक व संस्थात्मक देणगीदार मोकळ्या हाताने देणग्या देत आहेत. याच देणगीला गरजूंपर्यंत पोहचवणे महत्त्वाचे होते म्हणूनच या सर्व मदतकार्यासाठी सामूहिक आणि पारदर्शक मंच म्हणून रिलीफ पुणेची स्थापना करण्यात आल्याची माहिती रिलीफ पुणे मंचाने दिली.

रिलीफ पुणेसारख्या मंचांची गरज काय?

  1. मदत करणाऱ्यांचं एका भागात मदतकार्य चालू असतं, मात्र रोज वेगवेगळ्या भागातून मदतीची विनंती येते. मदत करायची इच्छा असली, तरी तिकडं पोहचणं शक्य नसतं. अशावेळी त्या-त्या भागात कोण मदतकार्य करत आहे याची माहिती आवश्यक असते.
  2. कधी कधी एकाच वस्तीतील एकाच घरात 4-5 संस्था येऊन किराणा देऊन जातात. हे टाळण्यासाठी या भागात आधी कुणी मदतकार्य केलंय का याची माहिती आवश्यक असते.
  3. असं काम करणाऱ्यांना मदतकार्य करण्यासाठी पैसे/किराणा/अन्न स्वरुपात देणगीची आवश्यकता असते.

थोडक्यात सर्व गरजूंच्या अडचणी सोडवायच्या तर एकेकटी संस्था/गट मदतीसाठी पूर्ण पडणार नाही. त्यासाठी मदतकार्य करणारे गट, देणगीदार व गरजू लोक यांनी टीम म्हणून एकत्र मिळून करणे आवश्यक आहे. याचसाठी पुण्यात काही तरुण इंजिनिअर्स व डॉक्टर्स यांनी एकत्र येऊन ‘रिलीफ’ हा वेब प्लॅटफॉर्म बनवला आहे. ‘रिलीफ’मध्ये पुणे-पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये चालू असणाऱ्या मदतकार्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

रिलीफ पुणे या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये

  1. पुणे-पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या भागातील 200 हून अधिक मदतकार्यांची माहिती व संपर्क क्रमांक
  2. किराणा, जेवण, आसरा, साबण-सॅनिटायझर, पीपीई, घरपोच सेवा, वाहनसेवा, आरोग्यसेवा, हेल्पलाईन इ. विविध मदतकार्यांचा समावेश
  3. रोजंदारीवरचे कामगार, स्थलांतरित, बेघर, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, कचरावेचक, तृतीयपंथी, सेक्स वर्कर्स यांच्यासाठीच्या मदतकार्यांचा समावेश
  4. शहरातील भाग, मदतीचे स्वरुप, मदत दिलेला समुदाय यानुसार मदतकार्य शोधण्याची सोय
  5. देणगी देऊ इच्छिणाऱ्या लोकांची यादी
  6. लोकांचा प्लॅटफॉर्म: या प्लॅटफॉर्ममध्ये लोकांना त्यांच्या माहितीतल्या मदतकार्याची भर घालता येईल. तसेच स्वतःला देणगी द्यायची असेल तर त्याचीही नोंद करता येईल.
  7. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत प्लॅटफॉर्म उपलब्ध
  8. वापरायला पूर्णपणे मोफत प्लॅटफॉर्म. आम्ही देणगी स्वीकारत नाही.
  9. कोणत्याही स्मार्टफोन/कॉम्प्युटरवर संकेतस्थळ (https://reliefpune.in/) सहजपणे उपलब्ध.

या प्लॅटफॉर्मचा उपयोग कसा करता येईल?

1. जर तुम्ही गरजूंपर्यंत पोहचून प्रत्यक्ष मदतकार्य करत आहात, तर तुमच्या भागामधील देणगीदार आणि इतर मदतकार्ये यांचा या प्लॅटफॉर्मवर शोध घेता येईल. त्यांच्यासोबत भागीदारी करता येईल. 2. जर तुम्ही मदतकार्यांसाठी देणगी देऊ इच्छिता, तर तुमच्या भागात चालू असणाऱ्या किंवा तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मदतकार्यांचा या प्लॅटफॉर्मवर शोध घेता येईल. तुमच्या पसंतीस पडलेल्या मदतकार्याला देणगी देता येईल. 3. जर तुम्ही स्वतः गरजू आहात किंवा गरजूंच्या संपर्कातील व्यक्ती आहात, तर तुमच्या भागातील मदतकार्यांचा या प्लॅटफॉर्मवर शोध घेता येईल. मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधता येईल. 4. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, मेल इ. माध्यमातून तुमच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत या प्लॅटफॉर्मबद्दल माहिती पोचवता येईल.

नागरिकांनी त्यांचा प्रतिसाद, सुचना कळवण्यासाठी आणि प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा सुचवण्यासाठी 7218395723 किंवा 9607262557 किंवा 9822195424 क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन रिलीप मंचाच्यावतीने  (https://reliefpune.in/)केलं आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5218, कोठे किती रुग्ण?

कुष्टरोग्यांपासून हातावर पोट असणाऱ्या मजूरांपर्यंत घरपोच जीवनावश्यक वस्तू, ‘वोपा’ संस्थेचा ‘लाख’मोलाचा पुढाकार

Lockdown : 500 किमीची पायपीट, चालून चालून थकलेल्या 23 वर्षीय तरुणाचा निवारागृहात मृत्यू

8 महिन्यांची गर्भवती, पतीसोबत अन्न-पाण्याविना 100 किमीपर्यंत पायपीट

Lockdown : चिमुकल्याला कडेवर उचलून ‘हिरकणी’चा प्रवास, बाळाच्या उपचारासाठी आईची 30 किमी पायपीट

Digital platform Relief Pune to help poor amid lockdown

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.