2024 Rashi Bhavishya in Marathi : वृषभ राशीच्या लोकांसाठी कसे जाणार 2024 वर्ष, संकटे पाठ सोडणार का?

2024 वर्ष सूरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. हे नवीन वर्ष आपल्या राशीला कसे जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. Tv9 मराठीच्या माध्यामातून जाणून घेऊया हे नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी कसे जाणार आहे. या वर्षात आर्थिक स्थिती कशी असेल. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष कसे असेल? हे सर्व तपशिलवार जाणून घेऊया.

2024 Rashi Bhavishya in Marathi : वृषभ राशीच्या लोकांसाठी कसे जाणार 2024 वर्ष, संकटे पाठ सोडणार का?
वृषभ - गुरु गोचरमुळे या राशीच्या लोकांना काही चढ-उतार पाहावे लागू शकते. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात काही तणावाचा सामना करावा लागू शकतो. Image Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 9:06 PM

मुंबई : 2024 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काहीच दिवस उरले आहे. ज्योतिषशास्त्राच्या (2024 Horoscope) दृष्टीने हे वर्ष सर्व बारा राशींसाठी कसे असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष कसे जाणार यावर एक नजर टाकूया.  वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्षाची सुरुवात 2023 च्या तुलनेत थोडी तणावपूर्ण असू शकते. यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. या वर्षी प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. 2024 हे वर्ष शिक्षण, करिअर, प्रेमसंबंध आणि आरोग्य इत्यादींच्या दृष्टिकोनातून कसे असेल? 2024 ची वृषभ राशीभविष्य जाणून घ्या

असे असेल वैवाहिक जीवन

वृषभ राशीच्या लोकांच्या प्रेमात चढ-उतार असतील. थोडीशी तणावपूर्ण परिस्थिती तुम्हा दोघांनाही त्रास देऊ शकते. तुमचा जोडीदार काही गोष्टींवर तुमचा गैरसमज करू शकतो, ज्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. या वर्षी ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्यासाठी लग्नाची शक्यता आहे. तुमचा स्नेह वाढेल आणि तुम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकाल आणि नात्याचे महत्त्व समजून घेऊन तुम्ही तुमच्या प्रियकरावर मनापासून प्रेम कराल.

 करिअरसाठी कसे असेल नवीन वर्ष?

नोकरदार लोकांच्या जीवनात कठोर परिश्रम करण्याची प्रक्रिया सुरू राहील. परिश्रम करूनच तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. कष्ट करायला मागे पूढे पाहू नका. यावेळी तुमचे चांगले काम आणखी चांगले करणे हेच तुमचे ध्येय असले पाहिजे. तुम्हाला फक्त मेहनत करत राहावे लागेल.  तुम्ही तुमच्या कामाबद्दल खूप गंभीर असाल आणि मेहनतीने काम कराल. याचा फायदा असा होईल की तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संगत मिळेल. ते तुम्हाला आधार देतील. नोकरीच्या संदर्भात परदेशात जाण्याची संधीही देऊ शकता.

हे सुद्धा वाचा

आर्थिक बाबतीत असे असेल हे वर्ष

आर्थिक जीवन तुम्हाला संमिश्र परिणाम देईल. जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही या वर्षी विचार करू शकता. पैशाची कमतरता भासणार नाही पण अनावश्यक खर्च टाळावा. या वेळी तुम्हाला अनअपेक्षीत धनलाभही होवू शकतो. आवश्यक बाबींवर खर्च केल्यास पैशाचा ओघ सुरूच राहील. वृषभ राशीच्या लोकांना या वर्षी खूप मेहनत करून यश मिळेल. शनिदेवाच्या कृपेने आणि आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांना यश मिळेल आणि भरपूर लाभही मिळतील. यासोबतच तुम्हाला नवीन वर्षात आर्थिक लाभही मिळतील ज्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकाल.

आरोग्याच्या बाबतील कसे असणार हे वर्ष?

या वर्षी आरोग्यही चांगले राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या प्रकृतीची खूप काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात कमकुवत राहील. तथापि, वर्षाच्या मध्यात तब्येत हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे.

वृषभ कौटुंबिक कुंडली 2024

या वर्षी तुमचे तुमच्या वडिलांशी चांगले संबंध निर्माण होतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. या वेळी कोणताही प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमचे भावा-बहिणींसोबतचे संबंध दृढ राहतील आणि ते तुम्हाला वेळोवेळी मदत करत राहतील. तुम्हाला नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान दूरच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याची संधी देखील मिळू शकते. यामुळे कुटुंबातही आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये भाग्यवान अंक 2 आणि 7 असतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.