Alum Tips : तुरटीचा एक तुकडा बदलेल तुमचं नशिब, आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जाणून घ्या ज्योतिषीय उपाय

Alum : जंतूनाशक म्हणून तुरटीचा वापर केला जातो. पण हीच तुरटी तुमच्या नशिबाचं दार उघडू शकते. ज्योतिषशास्त्रात तुरटीचे तोडगे देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत

Alum Tips : तुरटीचा एक तुकडा बदलेल तुमचं नशिब, आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जाणून घ्या ज्योतिषीय उपाय
Alum Tips : तुरटीचा एक तुकडा बदलेल तुमचं नशिब, आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जाणून घ्या ज्योतिषीय उपाय
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 8:44 PM

मुंबई : पृथ्वीतलावरील प्रत्येक वस्तूत सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा संचार असतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात तशा पद्धतीने वस्तूंचा वापर केला जातो. नकारात्मक वस्तू दूर सारून सकारात्मक वस्तू घरात आणल्या जातात. खडे मीठ, क्रिस्टल प्रमाणे वास्तुशास्त्रात तुरटीचा वापर केला जातो. तुरटीच्या तोडग्याने कामं चुटकीसरशी पूर्ण होतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. घरात सुख समृद्धीसह आनंदी वातावरण तयार होतं. तसेच उद्योग आणि नोकरीत तुम्हाला यश मिळू शकते. चला जाणून घेऊयात ज्योतिषीय उपाय..

कर्जातून दिलासा मिळावा यासाठी तोडगा

तुमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहीला असेल आणि वारंवार प्रयत्न करूनही कर्ज फेडता येत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. बुधवारी तुरटीचा एक छोटा तुकडा घेऊन त्यावर शेंदूर लावा. त्यानंतरर पानात ठेवा आणि धाग्यात बांधा. बुधवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि दगडाने दावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

धन लाभ मिळावा यासाठी तोडगा

अनेकदा मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे कधी कधी मानसिक संतुलन खराब होतं. तसेच आर्थिक स्थितीही खराब होते. त्यामुळे रोज पाण्यात तुरटी टाकून अंघोळ करावी. यामुळे आर्थिक मार्ग मोकळे होतात.

पैशांची अडचण दूर करण्यासाठी तोडगा

पैशांची अडचण आणि अकारण होणार खर्च रोखण्यासाठी लाल कपड्यात छोटा तुरटीचा तोडगा बांधा. यानंतर देवी लक्ष्मीला अर्पण करा. विधीवत पुजा केल्यानंतर घरातील तिजोरीत ठेवा. यामुळे घरात पैशांची चणचण भासत नाही.

आवडती नोकरी मिळवण्यासाठी तोडगा

अनेकदा प्रयत्न करूनही आवडती नोकरी मिळत नाही. सर्वकाही ठिक असताना मुलाखतीत काही ना काही त्रुटी काढली जाते. अशा स्थितीत तुरटीचा उपाय करू शकता. तुरटीचे पाच तुकडे घ्या, निळी फुले नवमीला देवी दुर्गेला अर्पण करा.

वास्तुदोष दूर करण्यासाठी तोडगा

घरात नकारात्मक ऊर्जा आणि वास्तु दोष असेल त्यावर दिलासा मिळवण्यासाठी तुरटीचा उपाय करू शकता. गुरुवार सोडून रोज लादी पुसताना पाण्यात मिठ आणि थोडी तुरटी टाका. यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा वावर होतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.