Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | ज्योतिषशास्त्रानुसार यूपीत कोणाची येणार सत्ता ? जाणून घ्या मतमोजणीपूर्वी यूपीचा निकाल!

यूपीशिवाय देशाच्या राजकारणाची कल्पना करणे कठीण आहे. आज म्हणजेच 10 मार्च 2022 रोजी या सर्वात महत्त्वाच्या राज्याचे निवडणूक निकाल लागणार आहेत.

Zodiac | ज्योतिषशास्त्रानुसार यूपीत कोणाची येणार सत्ता ? जाणून घ्या मतमोजणीपूर्वी यूपीचा निकाल!
UP
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 5:21 PM

मुंबई : यूपीशिवाय देशाच्या राजकारणाची कल्पना करणे कठीण आहे. आज म्हणजेच 10 मार्च 2022 रोजी या सर्वात महत्त्वाच्या राज्याचे निवडणूक निकाल लागणार आहेत. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Assembly Election Result 2022),उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलेय. आता सर्वांचं लक्ष या राज्यांच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागलंय. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं (BJP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष (SP) आणि आरएलडीनं निवडणूक लढवली. मायावती यांनी बसपाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तर, काँग्रेसच्या प्रचाराचं नेतृत्त्व प्रियांका गांधी यांनी केलं. उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहावं लागणार आहे. पण या निकालाबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगतय हे जाणून घेऊयात.

भाजपसाठी वाईट वेळ, योगींसाठी चांगली! डॉ अजय भांबी यांच्या मते भारतीय जनता पक्षाच्या कुंडलीमध्ये सर्वात 2 प्रभावशाली ग्रह पाहायला मिळत आहेत . त्यापैकी एक आहे बुध आणि दुसरा आहे चंद्र. या दोन ग्रहांनपैकी चंद्र ज्योतिशास्त्रात भावनीक मानला जातो. तर बुध तर्क असणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे सहज कोणलाच सत्ता मिळणार नाही. भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. पक्षाच्या कुंडलीनुसार, मे 2022 पर्यंतचा काळ त्यांच्यासाठी फारसा चांगला दिसत नाही, पण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार योगी आदित्यनाथ यांच्या पत्रात राज योग दिसत आहे. योगीजी सध्या सदे सती मधून जात असले तरी त्यामुळे त्यांच्या जीवनात मानसिक तणाव आणि संघर्ष दिसत आहे.

यूपी समृद्ध राज्य होईल उत्तर प्रदेशच्या कुंडलीत आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बाहेरच्या घरात चंद्र आणि मंगळ सोबत असलेला राहू आपल्या महादशामध्ये उत्तर प्रदेशला प्रसिद्धी देईल. येत्या काही काळात उत्तर प्रदेश भारताची नवीन आर्थिक राजधानी म्हणून उदयास येईल आणि धर्म, पर्यटन, उद्योग इत्यादी क्षेत्रांमध्ये एक श्रीमंत राज्य बनेल.

सत्ता बदलणार नाही अशीच शक्यता उत्तर प्रदेश राज्याची स्थापना १ एप्रिल १९३७ रोजी झाली. या तारखे नुसार उत्तर प्रदेशचा धनु राशी आहे. या राशींत राहूची महादशा 2031 पर्यंत चालणार आहे. ज्यामध्ये बुधाची अंतरदशा 2023 पर्यंत चालणार आहे. अशाप्रकारे, सध्याच्या ग्रहस्थितीनुसार, उत्तर प्रदेशच्या पत्रात राज्याची सत्ता बदलताना दिसत नाही.

संबंधीत बातम्या

10 march 2022 Panchang | 10 मार्च 2022, गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 4 लोकांशी प्रामाणिकपणे मैत्री केल्यास आयुष्याचे सार्थक होईल

Surya Grahan 2022 | या तारखेला होणार 2022 वर्षातील पहिले सूर्यग्रहण, 4 राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.