Astrology 2023 : 100 वर्षानंतर तयार झाला ‘आदित्य मंगळ योग’, तीन राशीच्या जातकांना मिळेल जबरदस्त लाभ
Aditya Mangal Yog : ज्योतिषशास्त्रात ठरावीक कालावधीनंतर ग्रहांची उलथापालथ होत असते. त्याचा राशीचक्रावर परिणाम होतो. काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम होतो. चला जाणून घेऊयात आदित्य मंगळ योगाबाबत...
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह कधीच एका जागेवर ठाण मांडून बसत नाही. ठरावीक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. गोचर केल्यानंतर प्रत्येक दिवशी अंशात्मक बदल होत असतो. त्यामुळे त्या त्या राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. कधी कधी तर ग्रहांची कित्येक वर्षांनी जुळून येते. असाच एक योग 100 वर्षांनी तूळ राशीत जुळून आला आहे. सूर्याने तूळ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत मंगळ आणि बुध ग्रह पहिल्यापासूनच विराजमान आहेत. त्यामुळे तूळ राशीत 100 वर्षानंतर आदित्य मंगळ योग जुळून येत आहे. या योगाचा संपूर्ण राशीचक्रावर परिणाम होईल. पण तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ होईल. चला जाणून घेऊयात या तीन राशींबाबत…
या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मिथुन : या राशीच्या पंचम स्थानात आदित्य मंगळ योग तयार होत आहे. त्यामुळे या कालावधीत काही चांगली बातमी कानावर पडू शकते. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. तसेच राहु आणि केतुने 30 ऑक्टोबरला राशी बदल करताच त्याचा थेट फायदा हणार आहे. त्यामुळे नव्या नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना लाभ मिळेल. कमी प्रयत्नात अधिक फळ अशी स्थिती आहे. प्रेम प्रकरणातही यश मिळेल.
सिंह : आदित्य मंगळ योग या राशीच्या सप्तम भावात बनत आहे. त्यामुळे कौटुंबिक स्तरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. भावंडांसोबत वाद सुरु असेल तर ते संपुष्टात येतील. जमिनजुमल्यात आवश्यक लाभ मिळू शकतो. न्यायालयीन प्रकरणात आपल्या बाजून निकाल लागेल. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील. भौतिक सुखांचा मार्ग मोकळा होईल. परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल.
तूळ : या राशीतच आदित्य मंगळ योग तयार होत आहे. त्यामुळे आत्मविश्वास दुपटीने वाढेल. एखादं काम खात्री देऊन पूर्ण कराल. वाढलेली क्षमता पाहून तुमच्याकडे कामाचा वेग वाढेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. प्रगतीची नवी दारं खुली होतील. नोकरीच्या ठिकाणी सर्वांचं सहकार्य मिळेल. त्यामुळे किचकट कामंही झटपट पूर्ण कराल. अविवाहित लोकांसाठी हा काळ चांगला जाईल. जबाबदारी नसल्याने नोकरीत बदल करू शकता. तसेच चांगली स्थळं चालून येतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)