100 वर्षानंतर ग्रहण आणि सूर्य शनिची युती, या राशींना मिळणार लाभ
ज्योतिषशास्त्रात बऱ्याचशा घडामोडी एकदा घडल्या की वर्षानुवर्षे तसा योग जुळून येत नाही. 100 वर्षानंतर राशीचक्रात एक दुर्मिळ योग पाहायला मिळणार आहे. सूर्यग्रहणावेळी शनि आणि सूर्य एकाच राशीत असणार आहेत. त्यामुळे हा दुर्मिळ योग राशीचक्रावर परिणाम करणारा असणार आहे.
वर्ष 2025 सुरु होऊन काही दिवसांचा काळ लोटला आहे. असं असताना ग्रहांच्या घडामोडींकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून आहे. ग्रह ताऱ्यांमुळे मानवी जीवन तसेच पृथ्वीतलावर परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्राचं म्हणणं आहे. त्यामुळे ग्रहांच्या घडामोडींकडे ज्योतिष बारीक लक्ष ठेवून असतात. 2025 वर्षात ग्रहमंडळात एक अद्भुत अशी घटना घडणार आहे. सूर्यग्रहण आणि सूर्य-शनिची युती एकाच दिवशी पाहायला मिळणार आहे. खरं तर असा मेळ 100 वर्षानंतर घडणार आहे. शनिदेव अडीच वर्षानंतर स्वत:च्या कुंभ राशीतून मीन राशीत राशीत प्रवेश करणार आहेत. 29 मार्च 2025 रोजी हे गोचर होणार आहे. 29 मार्च ही तारीख यासाठी खास आहे. कारण या दिवशी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. यामुळे काही राशींचं नशिब चमकणार आहे. तर काही राशींना या स्थितीचा फटका बसणार आहे. चला जाणून घेऊयात लकी राशींबाबत
कुंभ : या राशीच्या दुसऱ्या स्थानात या घडामोडी घडणार आहे. हे स्थान धन आणि वाणीचं स्थान आहे. तुम्ही तुमच्या वाणी समोरच्यावर प्रभाव टाकाल.यामुळे जातकांना अकस्मित धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा सुधारलेली दिसेल. करिअरमध्ये काही लाभ मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या जातकांना हा काळ सर्वोत्तम असणार आहे. जोडीदाराकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल.
वृषभ : या राशीच्या लाभ आणि उत्पन्न स्थानात ही घडामोड घडणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना त्याचा लाभ मिळणार यात शंका नाही. उद्योग धंदा आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. प्रत्येक क्षेत्रात तु्म्हाला यश मिळेल. जोडीदाराकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील.
धनु : या राशीच्या चतुर्थ स्थानात ग्रहांची घडमोड होणार आहे. त्यामुळे भौतिक सुखांची नांदी या राशीच्या जातकांना अनुभवता येणार आहे. प्रॉपर्टी खरेदीसाठी हा काळ उत्तम राहील. तसेच महागड्या वस्तू विकत घेण्यासाठी हा काळ अनुकूल असेल. तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला या काळात परत मिळू शकतात.