Rajyog | 100 वर्षानंतर 3 राशींच्या गोचर कुंडलीत चार महा राजयोग, ग्रहांच्या साथीने होणार मालामाल
ग्रहांचा राशी भ्रमण कालावधी हा वेगवेगळा असतो. त्यामुळे शुभ अशुभ योग तयार होतात. त्याचा तसाच परिणाम दिसून येतो. आता 100 वर्षानंतर 4 राजयोग तयार होत आहेत.
मुंबई : गोचर कुंडलीतील ग्रहांची स्थिती बरंच काही सांगून जाते. प्रत्येक ग्रह आपल्या स्वभावानुसार फळ देत असतो. 12 घरांमध्ये असलेल्या ग्रहांच्या स्थितीमुळे शुभ अशुभ योग तयार होत असतात. अशीच काही योगांची स्थिती 100 वर्षानंतर जुळून आली आहे. चार शुभ योग 100 वर्षांनी घडत आहेत. यात बुधादित्य राजयोग, शश महापुरुष राजयोग, केंद्र त्रिकोण राजयोग आणि शनि-मंगळ-शनिमुळे समसप्त राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. खास करून तीन राशींच्या जातकांना या स्थितीचा लाभ मिळणार आहे. राशीचक्रातील तीन लकी राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊयात..
या राशीच्या जातकांना मिळेल लाभ
कुंभ : या राशीच्या जातकांना ग्रहांच्या स्थितीमुळे विशेष लाभ होणार आहे. कारण बुधादित्य राजयोग या राशीच्या सहाव्या स्थानात तयार होत आहे. तसेच गोचर कुंडलीत शश, समसप्तक आणि केंद्र त्रिकोण योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना त्याची अनुभूती होणार आहे. अडकलेली कामं झटपट पूर्ण होतील. तसेच न्यायालयीन खटलाही बाजूने लागेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. तसेच आकस्मितपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणही चांगलं राहील.
वृषभ : या राशीच्या तिसऱ्या स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. त्यात सूर्य हा गोचर कुंडलीत प्रॉपर्टी आणि भौतिक सुखांचा कारक आहे. असं असताना शश, केंद्र त्रिकोण राजयोग आणि समसप्तक राजयोगाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जमिनीशी निगडीत प्रश्न सुटतील. तसेच भौतिक सुख अनुभवता येईल. थोड्याशा मेहनतीत चांगला पैसा हाती येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना या स्थितीचा लाभ मिळणार आहे.
वृश्चिक : गोचर कुंडलीत चार राजयोग तयार झाल्याने या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. भाग्य स्थानात बुधादित्य राजयोग तयार होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. तसेच कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. तुमच्या शब्दामुळे समोरची व्यक्ती प्रभावित होईल. तसेच तुमच्या कामांना प्राधान्य दिला जाईल. त्यामुळे हा काळ आनंदात जाईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)