100 वर्षानंतर गोचर कुंडलीत ‘केंद्र त्रिकोण राजयोग’, मंगळ आणि शुक्राच्या स्थितीमुळे तीन राशींना मिळणार लाभ
ज्योतिषशास्त्रानुसार काही योग शुभ गणले जातात. सिंह राशीत मंगळ आणि शुक्राच्या युतीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. या शुभ योगामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत त्यांची स्थितीही महत्त्वाची ठरते. ग्रहांच्या स्थितीमुळे शुभ अशुभ योग तयार होतात. अशीच काहीसी स्थिती सिंह राशीत तयार झाला आहे. सिंह राशीत शुक्र आणि मंगळ यांची युती झाली आहे. त्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. जवळपास 100 वर्षानंतर अशी स्थिती निर्माण झाली आहे. मंगळ ग्रह सिंह राशीत 1 जुलै 2023 रोजी दाखल झाला आहे. तसेच या राशीत 17 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. तर 7 जुलै रोजी शुक्र ग्रहाने कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश केला आहे. 7 ऑगस्टपर्यंत शुक्र या राशीत राहणार आहे. त्यामुळे 31 दिवस तीन राशीच्या जातकांना चांगलं फळ मिळणार आहे.
कुंडलीत जेव्हा तीन केंद्र भाव जसं की 4, 7, 10 आणि तीन त्रिकोण भाव जसं की 1, 5, 9 एकमेकांशी जोडले जातात किंवा युती होते. तेव्हा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतो. हा योग सर्वात शुभ मानला जातो.
या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मेष : केंद्र त्रिकोण राजयोगामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. कारण या राशीचा शुक्र दुसऱ्या आणि सातव्या स्थानाचा स्वामी आहे. शुक्र म्हणजे भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. जे काम अशक्य वाटत होतं ते तुम्ही सहज पूर्ण कराल. त्यामुळे वरिष्ठांकडून पाठीवर कौतुकांची थाप पडेल. कुटुंबात तुमच्या शब्दाला मान असेल. तुम्ही सांगलेल्या गोष्टी तंतोतंत पाळल्या जातील. तुमच्या मार्गदर्शनाचा कुटुंबाला फायदा होईल.
तूळ : शुक्र ग्रह या राशीचा स्वामी ग्रह आहे. तसेच अष्टम स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या केंद्र त्रिकोण राजयोगाचा या राशीच्या जातकांना फायदा होईल. उत्पन्नात वाढ होईल आणि आर्थिक स्रोत निर्माण होतील. तुमची समाजमनावर एक वेगळीच छाप पडेल. तुमच्या माध्यमातून एक नवं नेतृत्व समाजाला अनुभवता येणार आहे. धनप्राप्तीने नवे मार्ग खुले होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नतीच्या नव्या संधी चालून येतील.
सिंह : केंद्र त्रिकोण राजयोग या राशीत असलेल्या मंगळ आणि शुक्रामुळे तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळेल. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरी पडेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना सकारात्मक बदल दिसून येतील. प्रॉपर्टी किंवा घर खरेदीचा योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)