100 वर्षानंतर शनि गोचर आणि सूर्य ग्रहण असा अद्भूत योग, या राशींना मिळणार ग्रहांची साथ
2025 हे वर्ष सर्वच कारणांमुळे चर्चेत आहे. यावेळी 12 वर्षांनी प्रयागराजमध्ये कुंभ मेळा होत आहे. असं असताना सर्वच ग्रह या वर्षी राशीबदल करणार आहेत. खासकरून शनि गोचर आणि सूर्य ग्रहण असा एक अदभूत योग जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस येणार आहेत.
2024 वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काउंटडाउन सुरु झालं आहे. नव्या वर्षात ग्रहांची उलथापालथ होणार आहे. त्याकडे ज्योतिषांसोबत ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवण्याऱ्यांचं लक्ष लागून आहे. ग्रहांच्या या उलथापालथीचा पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम दिसून येणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान आहेत. मार्च महिन्यात शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. रण हा राशीबदल करत असताना एक अद्भुत योग जुळून आला आहे. जवळपास 100 वर्षांनी शनि गोचर आणि सूर्य ग्रहण असा योग आहे. कारण शनिदेव गोचर करणार त्याच दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे. हा शतकांमध्ये एकदा जुळून येणारा दुर्लभ योग आहे. या योगामुळे काही राशींसाठी चांगले दिवस येणार आहेत. चला जाणून घेऊयात त्या लकी राशींबाबत
या राशींना मिळणार लाभ
मिथुन : या राशीसाठी सूर्यग्रहण आणि शनि गोचर हा लाभदायी ठरणार आहे. या काळात जातकांना चांगल्या गोष्टींची अनुभूती मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गस्थ लागतील. तसेच परदेशात प्रवास करण्याचा योग जुळून येईल. नोकरीच्या ठिकाणी जातकांना प्रमोशन मिळू शकतं. तसेच व्यवसाय करणाऱ्या जातकांना धनलाभ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.
धनु : या राशीच्या जातकाना या अद्भूत योगाचा लाभ मिळणार आहे. कोणत्याही कामात अपेक्षित यश मिळू शकते. समाजात मानसन्मान वाढेल. आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील. आई वडिलांची उत्तम साथ लाभेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. जे काही ठरवलं असेल ते योग्य वेळेत होईल. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. उद्योगधंद्यात प्रगती होईल.
मकर : खरं तर या राशीची साडेसाती शनि गोचरासोबत संपणार आहे. त्यामुळे गेल्या साडेसात वर्षात जे काही भोगलं आहे त्यातून दिलासा मिळेल. पाय जमिनीवर असल्याने काही गोष्टी सकारात्मक घडतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)