18 वर्षानंतर शुक्र आणि राहु या मित्र ग्रहांची युती, या राशींना मिळणार लाभ
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह राशी बदलासोबत नक्षत्र बदलही करतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. 18 वर्षानंतर नक्षत्र गोचर करताना राहु आणि शुक्र एकत्र येणार आहेत. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा दैत्यगुरु आहे. त्यामुळे राहु हा ग्रह त्याच्या अधिपत्याखाली चांगली फळं देतो. राहु ग्रह दीड वर्षांनी म्हणजे 18 महिन्यांनी राशी बदल करतो. तसेच 27 नक्षत्रात भ्रमण करताना एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जाण्यासाठी 8 महिन्यांचा अवधी घेतो. त्यामुळे एका नक्षत्रात पुन्हा येण्यासाठी 18 वर्षांचा कालावधी लागतो. वैदिक पंचांगानुसार, 1 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी दैत्यगुरु शुक्र उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याच नक्षत्रात राहु असणार आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. दुसरीकडे, नक्षत्राशिवायत राहु आणि शुक्राची युती ही मीन राशीतही होणार आहे. 28 जानेवारीला सकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी शु्क्र मीन राशीत प्रवेश करेल. या राशीत राहु आधीच विराजमान आहे. त्यामुळे राहु आणि शुक्राची युती होणार आहे. दोन्ही ठिकाणी होणाऱ्या युतीमुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मेष : शुक्र ग्रहाने उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करताच या राशीच्या बाराव्या स्थानात असणार आहे. राहुसोबत याच स्थानात युती होईल. शनिची दृष्टीही या राशीवर असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना काही अडचणीत झटपट सुटका मिळणार आहे. विवाहातील बाधा दूर होतील आणि स्थळ चालून येतील. आरोग्यविषयक तक्रारीही या काळात दूर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. ज्या कामांच्या मागे लागला होतात ती कामं मिळतील. तसेच बाहेरगावी जाण्याचा योग जुळून येईल.
वृषभ : या राशीच्या एकादश स्थानात शुक्र राहुची युती होत आहे. या राशीच्या जातकांना त्याचे चांगले परिणाम करिअरमध्ये दिसून येतील. काही इच्छा झटपट पूर्ण होतील. व्यवसायात अपेक्षित प्रगती मिळेल. भौतिक सुखांची प्राप्ती होताना दिसेल. राजकारणाशी निगडीत लोकांना काही सकारात्मक बदल दिसतील. न्यायायलयीन प्रकरणंही झटपट पूर्ण होताना दिसतील.
मकर : या राशीच्या तिसऱ्या स्थानात शुक्र आणि राहुची युती होत आहे. या राशीच्या जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नव्या लोकांच्या संपर्कात याल. तुम्ही केलेल्या मेहनत आणि प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल. प्रवासाचे काही योग चालून येतील. या प्रवासात काही मोठी कामं झटपट होऊ शकतात. कौटुंबिक पातळीवर चांगला पाठिंबा मिळेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)