18 वर्षानंतर सूर्यदेव सापडणार राहु शनिच्या जाळ्यात, या तीन राशींची अडचण वाढणार
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राहुसोबत युती करतो तेव्हा तो अशुभ फळं देतो. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीत सूर्य आणि राहु यांची युती होत आहे. त्यामुळे ग्रहण योग तयार होत आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्राची गणितं ही सर्वस्वी ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. ग्रहांचे स्वभाव आणि फळं यावर ज्योतिष भविष्याचं भाकीत मांडतात. गोचर कुंडली व्यतिरिक्त कोणत्या ग्रहाची दृष्टी कशी आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरतं. मंगळ, गुरु आणि शनिला तीन दृष्टी आहेत. त्यामुळे एखादी युती झाली तरी त्यावर या तीन ग्रहांची नजर कशी आहे, ते पाहणंही महत्त्वाचं आहे. सूर्यदेव 14 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत राहु आधी सूर्यदेवांची वाट पाहात आहे. त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे.
ग्रहण योगासोबत शनिदेवांची तिसरी दृष्टी सूर्यदेवांवर पडणार आहे. ही दृष्टी ज्योतिषशास्त्रात अशुभ मानली जाते. त्यामुळे राशी चक्रातील 12 राशींवर परिणाम होईल. पण तीन राशींच्या जातकांना या काळात काळजी घेणं गरजेचं आहे.
या तीन राशीच्या जातकांना होणार त्रास
मेष – राहु आणि सूर्याच्या युतीमुळे या राशीत ग्रहण योग तयार होत आहे. खगोलीय गणितातही ग्रहण योगाची स्थिती असणार आहे. ग्रहण योग लग्न राशीत असल्याने त्रास होईल. त्यात मेष राशीचे स्वामी मंगळ आहेत. त्यामुळे या काळात शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. हृदयाशी निगडीत एखादा आजार बळावू शकतो. शनिदेवांच्या तिसऱ्या दृष्टीमुळे त्रास आणखी वाढणार. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.
सिंह – या राशीच्या जातकांना राहु आणि सूर्याची युती त्रासदायक ठरेल. या राशीच्या नवव्या स्थानात ग्रहण योग तयार होत आहे. त्यामुळे वडिलांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्यात तुम्हालाही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात धनहानी होऊ शकते. तसेच नशिबाची हवी तशी साथ मिळणार नाही. वडिलांसोबत वाद होऊ शकतात. या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घ्याल.
धनु – या राशीच्या पंचम स्थानात राहु आणि सूर्यामुळे ग्रहण योग तयार होत आहे. त्यामुळे घरात तणावपूर्ण वातावरण राहील. घरातील व्यक्तींना सर्वाधिक त्रास होईल. त्यामुळे या काळात एकच धावपळ उडेल. त्यामुळे त्रास वाढण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत. घरात कुणी हृदयविकराचा रुग्ण असेल तर त्याची जास्त काळजी घ्यावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)