19 वर्षानंतर अधिक मासात दुर्लभ योग, लक्ष्मी नारायण योगामुळे तीन राशींचं नशिब फळफळणार
अधिक मासाला सुरुवात झाली असून या महिन्यातील ग्रहांची स्थिती तीन राशींना फलदायी ठरणार आहे. लक्ष्मी नारायण योगामुळे राशीचक्रातील तीन राशींना लाभ मिळणार आहे.
मुंबई : अधिक श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. सौरवर्ष आणि चंद्रवर्ष यातील फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी म्हणजेच साडेबत्तीस वर्षांनी एक चंद्रमास दोनदा येतो. सौरवर्षात 12 महिन्यांचे 365 दिवस असतात. तर चंद्रमासात 354 दिवस येतात. त्यामुळे दरवर्षी 11 दिवसांचा साधारण फरक पडतो. हा फकर अधिकमासात भरून काढला जातो. अधिकमास 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या काळात वास्तुशांती, विवाह, उपनयन, देव प्रतिष्ठापना करू नयेत, असं सांगितलं गेलं आहे. 17 ऑगस्टपासून नीज श्रावण सुरु होईल. या महिन्यात व्रत कैवल्य करता येतील.
19 वर्षानंतर अधिक श्रावणाचा योग जुळून आला आहे.तसेच ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. यामुळे तीन राशींच्या जातकांवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुंचा आशीर्वाद असणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या त्या…
तीन राशींच्या जातकांना होणार फायदा
वृषभ : या राशीच्या जातकांना अधिक मास शुभ ठरेल. काही इच्छा या काळात पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी इच्छित पोस्ट मिळू शकते. तसेच आपल्या कामामुळे वरिष्ठ खूश होतील. तसेच भविष्याच्या दृष्टीकोनातून पाया मजबूत होईल. आईकडून काही आर्थिक मदत होऊ शकते. जागा खरेदीचा योग या काळात जुळून येईल. पण व्यवहार करताना कागदपत्रं व्यवस्थित तपासून घ्या. तसेच शेजारी जागेत अतिक्रमण करणार नाही याची काळजी घ्या.
सिंह : लक्ष्मी नारायण योग या राशीत तयार होत आहे. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. तसेच चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसून येईल. पारंपरिक व्यवसायात तुम्हाला प्रगती दिसून येईल. एखादी नवीन शाखा सुरु करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी योग अमलबजावणी करा. वैवाहिक जीवन या कालावधीत व्यवस्थित राहील. या काळात उत्पन्नात वाढ होऊ शकते.
तूळ : लक्ष्मी नारायण योग या राशीच्या उत्पन्न भावात तयार होत आहे. धार्मिक काळात आवड निर्माण होईल. मित्रांसोबत तीर्थ यात्रेला जाण्याचा योग जुळून येईल. तसेच अडकलेले पैसे या काळात मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं फळ मिळेल. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)