200 वर्षानंतर गुरु, शुक्र आणि शनिचा शुभ दृष्टी भेद, 4 राशींना होणार जबरदस्त फायदा

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत त्यांची दृष्टीही महत्त्वाची ठरते. 200 वर्षानंतर गुरु, शुक्र आणि शनिची शुभ दृष्टीचा योग जुळून आला आहे. त्यामुळे चार राशीच्या जातकांना फायदा होईल.

200 वर्षानंतर गुरु, शुक्र आणि शनिचा शुभ दृष्टी भेद, 4 राशींना होणार जबरदस्त फायदा
200 वर्षानंतर जुळून आला असा योग, गुरु शनि आणि शुक्राची एकमेकांवर शुभ नजर, या राशींना होईल लाभ
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 5:48 PM

मुंबई – ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला एक पूर्ण दृष्टी मिळाली आहे. जेव्हा एखादा ग्रह एका राशीत बसलेला असतो तेव्हा तो पूर्णपण सातव्या घराकडे पाहतो. सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्राकडे सातवी दृष्टी आहे. शनिकडे सातवीसह तिसरी आणि दहावी दृष्टी आहे. गुरुकडे सातवीसह पाचवी आणि नववी दृष्टी आहे. मंगळाकडे सातवीसह चौथी आणि आठवी दृष्टी आहे. तर राहु-केतुकडे सातवीसह पंचम-नवम दृष्टी आहे. त्यामुळे 200 वर्षानंतर शुभ दृष्टीचा योग जुळून आला आहे.

कोणत्या ग्रहाकडे कशी दृष्टी आहे समजून घ्या

  • सूर्य- सातवी
  • चंद्र- सातवी
  • मंगळ- चौथी, सातवी आणि आठवी
  • बुध – सातवी
  • गुरु- पाचवी, सातवी आणि नववी
  • शुक्र- सातवी
  • शनि – तिसरी, सातवी आणि दहावी
  • राहु- पाचवी, सातवी आणि नववी
  • केतु- पाचवी, सातवी आणि नववी

6 एप्रिलला शुक्र आपली स्वरास असलेल्या वृषभ राशीत आहे. 2 मे पर्यंत शुक्र या राशीत असणार आहे. शुक्र आणि गुरु एकमेकांपासून तिसऱ्या आणि अकराव्या राशीत स्थित आहेत. शनि आणि शुक्र एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या राशीत आहेत. त्यामुळे या स्थितीचा चार राशीच्या लोकांवर चांगला परिणाम दिसून येईल. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

मेष – या राशीच्या जातकांवर गुरु, शुक्र आणि शनिची शुभ दृष्टी आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल. प्रॉपर्टी आणि वाहन खरेदीचा योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

सिंह – या राशीवरही गुरु, शुक्र आणि शनिची शुभ दृष्टी आहे. त्यामुळे जातकांना चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना याची चांगली फळं मिळतील. व्यवसायिकांना त्यांच्या कामात यश मिळेल. आर्थिक प्रश्न सुटतील.

वृश्चिक – या राशीच्या जातकांना गुरु, शुक्र आणि शनिच्या शुभ दृष्टीचा लाभ मिळेल. यावेळी नशिबाची चांगली साथ मिळेल. नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगला काळ आहे.नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदाराची साथ मिळेल.

कुंभ – या राशीच्या जातकांना शुभ दृष्टीचा फायदा होईल. शनिदेव लग्न राशीत स्थित आहेत. त्यामुळे भाग्याची चांगली साथ मिळेल. भौतिक सुखप्राप्ती या काळात होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.