30 वर्षानंतर न्यायदेवता शनिचा कुंभ राशीत होणार उदय, या राशींवर असेल कृपादृष्टी
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळात रोज काही ना काही घडामोडी घडत असतात. प्रत्येकजण आपल्या अभ्यासातून ग्रहांचं विश्लेषण करत असतो. त्यानुसार फलज्योतिष सांगितलं जातं. शनि ग्रहाची स्थिती ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली गेली आहे. 30 वर्षानंतर कुंभ राशीत विराजमान झालेल्या शनिच्या स्थितीत काय बदल होणार ते जाणून घेऊयात.
मुंबई : शनि हे नाव ऐकलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. अनेकांना शनि आपल्या राशीला नकोच असं वाटतं. पण शनिचा फेरा कोणालाच चुकलेला नाही. आज नाहीतर उद्या शनिच्या प्रभावाखाली यायचं तर आहेच. शनिदेव 30 वर्षानंतर स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान आहे. अडीच वर्षानंतर शनिदेव गोचर करतील त्यापैकी आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे 2024 या वर्षात शनिदेव कुंभ राशीतच असतील. पण या कालावधीत शनिदेव उदय अस्त आणि वक्री होणार आहेत. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. शनिदेव मार्च महिन्यात कुंभ राशीत उदीत होणार आहेत. यामुळे राशीचक्रावर त्याचा परिणाम दिसून येईल. खासकरून तीन राशींना शुभ परिणाम दिसून येतील. करिअर आणि उद्योगधंद्यात अपेक्षित प्रगती दिसून येईल. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या ते…
या तीन राशींना मिळणार लाभ
कुंभ : शनिदेवांची ही स्वरास असून याच राशीत शनिदेव विराजमान आहे. त्यामुळे एखादी हालचाल झाली की त्याचा प्रभाव लगेच दिसून येतो. पहिलं स्थान आत्मविश्वासाचं असतं. या कालावधीत योग्य त्याची पारख करून निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कामाची शैली प्रभावशाली दिसून येईल. भागीदारीच्या धंद्यात प्रगती दिसून येईल. ठरवल्याप्रमाणे एक एक कार्य पार पडतील. त्यामुळे व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच प्रभाव दिसून येईल.
सिंह : या राशीच्या सप्तम भावात शनिदेव गोचर करत आहेत. हे स्थान पती पत्नी आणि भागीदारीचं स्थान आहे. कौटुंबिक स्तरावर गेल्या काही दिवसांपासून असलेले वाद दूर होतील. पत्नीसोबत सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. तसेच पत्नीची प्रत्येक कामात साथ मिळेल. या राशीत शनिमुळे शशयोग तयार झाला आहे. त्यामुळे भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल.
मेष : या राशीच्या एकादश स्थानात शनि उदीत होणार आहे. उत्पन्नाचं स्थान असल्याने आर्थिक स्थिती एकदम मस्त राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मनासारखा परतावा मिळेल. प्रवासात चांगल्या लोकांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा लाभ होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)