Shukra Asta 2023: 48 तासानंतर शुक्र ग्रहाची स्थिती बदलणार, तीन राशींना मिळणार नवे आर्थिक स्रोत

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या स्थितीवर घडामोडी अवलंबून असतात. त्यामुळे ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची ठरते. ऑगस्टच्या सुरुवातीलाच शुक्र ग्रह अस्ताला जाणार आहे.

Shukra Asta 2023: 48 तासानंतर शुक्र ग्रहाची स्थिती बदलणार, तीन राशींना मिळणार नवे आर्थिक स्रोत
Shukra Asta 2023: 48 तासानंतर शुक्र ग्रह जाणार सूर्याजवळ, तेज गेल्यानंतर तीन राशींना मिळणार लाभ
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 7:17 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाची स्थिती खूपच महत्त्वाची गणली गेली आहे. कारण शुक्र ग्रहाला भौतिक सुखांचा कारक मानलं गेलं आहे. त्यामुळे शुक्र कोणत्या स्थितीत आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं. आता शुक्र सिंह राशीत असून सूर्याच्या कक्षेत येणार आहे. यामुळे शुक्राचं तेज कमी होणार असून अस्ताला जाणार आहे. 4 ऑगस्टला शुक्र ग्रह सिंह राशीत अस्ताला जाणार आहे. या स्थितीचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. शुक्र ग्रह अस्ताला जाताच काही राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तीन राशींचा या कालावधीत भाग्योदय होणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या त्या…

या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

कर्क : शुक्र ग्रह अस्ताला जाताच कर्क राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. या कालावधीत आत्मविश्वासात वाढ होईल. आपल्या प्रभावाने समोरच्या व्यक्तींवर चांगला परिणाम दिसून येईल. या काळात योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. तसेच आर्थिक उत्पन्न चांगलं असल्यास पैसा राखून ठेवा. उगाचच कोणत्याही वस्तूंवर पैसा खर्च करू नका. पार्टनरशिपच्या धंद्यात यश मिळताना दिसेल. वैवाहिक जीवन या काळात चांगलं राहील.

वृषभ : शुक्र ग्रहाची स्थिती वृषभ राशीच्या जातकांसाठी अनुकूल असणार आहे. या काळात भौतिक सुखांची रेलचेल असेल. गाडी किंवा वाहन खरेदीचा योग या काळात जुळून येईल. लग्झरी वस्तूंचा उपभोग या काळात घेता येईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. तसेच करिअरमध्ये नव्या संधी चालून येतील. त्यामुळे दिवस आनंदात जातील. आई वडिलांकडून आर्थिक मदत होईल.

सिंह : शुक्र ग्रह वक्री अवस्थेत अस्ताला जाणार आहे. विशेष म्हणजे याच राशीत शुक्राची हालचाल होणार आहे. त्यामुळे या कालावधीत मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेला पैसा परत मिळेल तसेच काही योजना यशस्वी होतील. शेअर बाजार आणि लॉटरीच्या माध्यमातून धनलाभ होऊ शकतो. दुसरीकडे खर्चावर नियंत्रण ठेवणंही तितकंच गरजेचं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.