Kojagiri 2023 : 9 वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण योग, देवी लक्ष्मीची तीन राशींवर असेल कृपा

Chandragrahan On Kojagiri Pournima : ज्योतिषशास्त्रानुसार, कोजागिरी पौर्णिमेला ग्रहांचा अनोखा मेळा पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर चंद्रग्रहण असल्याने त्याचं महत्त्व वाढलं आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम होईल. तीन राशीच्या जातकांना लाभ मिळेल.

Kojagiri 2023 : 9 वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण योग, देवी लक्ष्मीची तीन राशींवर असेल कृपा
Kojagiri 2023 :कोजागिरी पौर्णिमेला 9 वर्षानंतर घडणार असं काही, तीन मिळणार जबरदस्त लाभ
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 9:14 PM

मुंबई : कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण असा योग 9 वर्षानंतर जुळून आला आहे. यापूर्वी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रह 8 ऑक्टोबर 2014 रोजी जुळून आलं होतं. हे चंद्रग्रहण भारतातून दिसलं होतं. अशीच स्थिती आता जुळून आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांचं महत्त्व वाढलं आहे. चंद्रग्रहण मेष राशीत होत आहे. मेष राशीत गुरु आणि राहुची युती आहे. त्यामुळे चांडाळ योग आहे. मात्र चंद्र आणि गुरुची युती होत असल्याने गजकेसरी योगही जुळून येणार आह. दुसरीकडे, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी चंद्राची शीतलता आणि अमृतवर्षाव होतो असं सांगितलं जातं. तसेच कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ही संपूर्ण स्थिती पाहता राशीचक्रावर शुभ अशुभ परिणाम होईल. तीन राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळणार आहे.

तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

मिथुन : या राशीच्या जातकांना ग्रहांची स्थिती लाभदायक ठरेल. देवी लक्ष्मीची कृपा मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. पण या कालावधीत वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. समाजात मानसन्मान वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवावा लागेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. उद्योगधंद्यात तुम्ही प्रगतीची नवी शिखरं गाठाल. तसेच उत्पन्नात वाढ होईल.

कर्क : या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती या काळात चांगली राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगला लाभ मिळेल. बॉसकडून कौतुकाची थाप पडेल. नव्या नोकरीची संधी मिळू शकते. पगार आणि इतर बाबी पटल्या तरच उडी मारण्याचा निर्णय घ्या. संपत्ती किंवा वाहन खरेदीचा योग जुळून येईल. कायदेशीर प्रकरणात यश मिळू शकतं.

मकर : उद्योगव्यवसायात तुम्हाला प्रगती दिसून येईल. कौटुंबिक स्तरावर गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. देवदर्शनाला जाण्याचा योग आहे. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्या. कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग जुळून येईल. आर्थिक स्थिती खराब असल्यास जोडीदारासोबत शेअर करा. कदाचित मार्ग सापडू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.