Horoscope 2023 : राशी बदलानंतर या दिवशी सूर्य करणार नक्षत्र परिवर्तन, कोणत्या राशींना मिळणार लाभ ते जाणून घ्या
Surya Nakshatra Parivartan : राशी बदलासोबत ग्रह नक्षत्रातील स्थानही बदलत असतात. त्यामुळे त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. आता सूर्यदेव रक्षाबंधन याच दिवशी नक्षत्र बदल करणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात 12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांना महत्त्व आहे. सूर्यदेवांना ग्रहमंडळात राजाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या भोवती ग्रहांचं भ्रमण होत असतं. त्यामुळे सूर्याच्या गोचर स्थितीकडे लक्ष लागून असतं. सध्या सूर्यदेव स्वरास असलेल्या सिंह राशीत विराजमान आहेत. रक्षाबंधन या दिवशी राशीबदल करणार आहे. सूर्य हा मघा नक्षत्रातून पूर्वा या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरुवार, 31 ऑगस्ट 2023 ला सकाळी 9 वाजून 44 मिनिटींना पूर्वा नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात 14 सप्टेंबर 2023 पर्यंत ठाण मांडून बसेल. त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्र परिवर्तनामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. काही राशींना फायदा, तर राशींना फटका बसू अशी स्थिती आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फायदा होणार ते
या राशींना होणार फायदा
वृषभ : सूर्यदेवाची नक्षत्र स्थिती वृषभ राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. काही गोष्टींचा गुंता सुटण्यास मदत होईल. तसेच आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. तुमचा प्रभाव इतर व्यक्तींवर दिसून येईल. वडिलासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. तसेच उद्योगधंद्यात त्यांच्याकडून अपेक्षित मदत होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील.तसेच गेल्या काही दिवसांपासून अडकलेली सरकारी कामं मार्गी लागतील.
मिथुन : या राशीच्या जातकांना ठरलेल्या योजनांमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. तसेच या काळात केलेली गुंतवणूक फलदायी ठरू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना काळजी घ्या. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. आर्थिक स्थिती या काळात एकदम भक्कम होईल. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील.
कर्क : सूर्याने पूर्वा नक्षत्रात ठाण मांडताच या राशीच्या जातकांवर प्रभाव दिसून येईल. सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश या काळात मिळू शकते. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन जबाबदारी मिळेल. हुद्दा वाढल्याने हाताखालच्या लोकांकडून काम करून घेता येईल. या काळातील प्रवासही तुम्हाला फळेल. काही लोकांच्या ओळखी किचकट कामात मदतीला येतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)