हजारो वर्षानंतर राहु, शनि आणि गुरुची अशी गोचर स्थिती, या राशींवर असेल कृपा
नववर्ष 2024 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे नवीन वर्ष कसं असेल यासाठी जातकांची उत्सुकता ताणली आहे. नववर्षात अत्यंत दुर्लभ असा योग जुळून येणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
मुंबई : ग्रहांच्या गोचराचा थेट परिणाम राशीचक्रावर होत असतो. ग्रहांची जरा तरी बदलली तरी त्याने चांगले वाईट परिणाम त्या त्या राशींवर होत असतात. अनेकदा ग्रहांची स्थिती हजारो वर्षानंतर जुळून येते. त्यामुळे त्या स्थितीचा राशीचक्रावर मोठा फरक दिसून येतो. नववर्ष 2024 मध्ये गुरु, शनि आणि राहुची स्थिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. कारण या ग्रहांच्या स्थितीमुळे एक अत्यंत दुर्लभ असा योग जुळून येणार आहे. जवळपास 1000 वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती असणार आहे. नववर्ष 2024 मध्ये राहु आणि शनि काही आपल्या राशी बदलणार नाहीत. पण गुरु राशी बदल करणार त्याने बऱ्याच उलथापालथी होतील. गुरु ग्रह मे महिन्यानंतर मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
गुरु ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश करताच शनि आपल्या मूळ त्रिकोण राशीत कुंभेत असतील. याच राशीत मार्गी आणि वक्री होतील. गुरु ग्रह मीन राशीचा स्वामी आहे. गुरु वृषभ राशीत येताच सप्तम दृष्टी नवम भावावर पडेल. त्यामुळे ग्रहांची अशी स्थिती हजारो वर्षांपूर्वी तयार झाली होती. आता तसाच योगायोग जुळून आला आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे.
या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मेष : या राशीच्या जातकांना ग्रहांच्या स्थितीचा लाभ होईल. अर्थात नववर्ष 2024 सुख आणि समृद्धीचं जाईल. गेल्या काही दिवसांपासून ज्या कामासाठी धडपड करत होतात. ती कामं पूर्ण होतील. केलेल्या मेहनतीला अपेक्षित फळ मिळाल्याने आनंद होईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील.
कुंभ : शनिदेव राशीतच विराजमान असून साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे. त्यात ग्रहांची अशी स्थिती काही अंशी दिलासा देतील. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. गुरुच्या पाठबळामुळे समाजात मानसन्मान मिळेल. आत्मविश्वासात दुपटीने वाढ होईल. जोखिम घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.
मीन : शनि साडेसातीचा पहिला टप्पा या राशीला सुरु आहे. तसेच राहु ग्रहही या राशीत दीड वर्षासाठी ठाण मांडून बसला आहे. पण गुरुच्या स्थितीमुळे अडचणी कमी होतील. हाती घेतलेलं काम पूर्णत्वास न्याल. अपेक्षेपेक्षा कमी पण तुल्यबळ यश मिळेल. आरोग्याच्या तक्रारींकडे कानाडोळा करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)