Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला सोन्या ऐवजी राशीनुसार खरेदी करा हा धातू, होईल प्रचंड धनलाभ
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार इतर धातू खरेदी करू शकता.
मुंबई : यंदा अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2023) हा सण 22 एप्रिलला शनिवारी साजरा होणार आहे. अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की जर तुम्हाला लग्नासाठी किंवा इतर शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त सापडत नसेल तर तुम्ही ते शुभ कार्य अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करून ते प्रसन्न होतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी (Gold Shopping) करू शकत नसाल तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार इतर धातू खरेदी करू शकता. दोन्ही परिस्थितीत तुम्हाला समान लाभ मिळते. चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कोणत्या राशीचे लोकं कोणते धातू खरेदी करू शकतात.
राशीनुसार करा धातू खरेदी
मिथुन आणि कन्या
या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला पितळेचे भांडे खरेदी करावेत. यामध्ये ताट, लोटा अशी भांडी खरेदी करू शकतात. असे केल्याने नोकरी-व्यवसायात वाढ होईल. सकारात्मकता वाढेल. कर्जातून मुक्ती मिळेल.
मकर
अक्षय तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी सोन्याऐवजी स्टीलची भांडी किंवा लोखंडी वस्तू खरेदी कराव्यात. असे केल्याने त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळेल आणि मानसिक शांती मिळेल. वडिलोपार्जीत मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ आणि कर्क
या दोन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया 2023 ला सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ राहील. असे केल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता वाढेल.
धनु आणि मीन
या राशीचे लोक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि पितळेच्या वस्तू खरेदी करू शकतात. असे केल्याने त्यांचे रखडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल.
वृश्चिक
या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला सोन्याऐवजी तांब्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करणे चांगले राहील. असे केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
मेष आणि सिंह
अक्षय तृतीया 2023 रोजी या दोन राशीच्या लोकांनी सोने आणि तांबे खरेदी करावेत. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)