Astrology : लवकरच केतु आणि मंगळाची युती येणार संपुष्टात, दिवाळीपूर्वी या राशींचं नशिब चमकणार

Mangal Ketu Yuti : मंगळ आणि केतुची अशुभ युती तूळ राशीत तयार झाली आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होत आहे. पण 23 दिवसात ही युती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

Astrology : लवकरच केतु आणि मंगळाची युती येणार संपुष्टात, दिवाळीपूर्वी या राशींचं नशिब चमकणार
Astrology :मंगळ आणि केतुची अशुभ युती तुटणार, तीन राशींच्या जातकांचं नशिब फळफळणार
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 10:50 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार दीड वर्षानंतर राहु आणि केतु हे ग्रह राशी बदल करणार आहेत. सध्या केतु आणि मंगळ यांची अभद्र युती तूळ राशीत आहे. मंगळ ग्रहाने 3 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करताच ही युती झाली आहे. मंगळ आणि केतु हे दोघंही पापग्रह आहे. त्यांची युती त्रासदायक गणली जाते. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येत आहे. पण ही युती आता फक्त 27 दिवस असणार आहे. त्यानंतर ही युती संपुष्टात येणार आहे. कारण केतु वक्री गोचर करत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 30 ऑक्टोबरला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. नोव्हेंबरपासून काही राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

मेष : मंगळ आणि केतुची अभद्र युती मेष राशीच्या जातकांना त्रासदायक आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण या राशीत राहु आणि गुरुची अभद्र युतीही आहे. पण राहु आणि केतुचं गोचर होताच या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. शेअर बाजारात गुंतवणूक करणं फलदायी ठरेल. शारीरिक आणि मानसिक त्रासातून सुटका होईल.

मिथुन : या राशीची आर्थिक अडचण दूर होईल. नवीन व्यवसाय सुरु करू शकता. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. कौटुंबिक संपत्तीतून लाभ मिळू शकतो. कर्जाचा डोंगर हलका होईल. कौटुंबिक स्तरावर आनंद राहील. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. पिकनिकला जाण्याची योजना आखू शकता.

तूळ : नवीन नोकरीची संधी चालून येईल. तसेच पदोन्नतीमुळे नवी कामगिरी हाती पडेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल. उद्योगधंद्यात यश मिळू शकते. तसेच धनलाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतित कराल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. तसेच लग्नासाठी घरच्यांकडून होकार मिळण्याची दाट शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.