Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amavasya 2024 : आजपासून अमावस्या दोष सुरू, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध!

Amavasya 2024 अमावस्येच्या रात्रीचे वर्णन भयंकर रात्र असे केले जाते. पंचांगानुसार, अमावस्या 11 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:05 वाजता समाप्त होईल. या काळात धनु राशीमध्ये अमावस्या दोष आहे. पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांनुसार जेव्हा पत्रिकेत चंद्र आणि सूर्य एकाच भावात बसतात तेव्हा अमावस्या दोष तयार होतो.

Amavasya 2024 : आजपासून अमावस्या दोष सुरू, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध!
अमावस्या Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 7:01 PM

मुंबई : 2024 च्या पहिल्या अमावस्या तिथीला सुरुवात झाली आहे. अमावस्येबाबत (Amavasya) अनेक पौराणिक समजुती आहेत. काही लोकं या तिथीला शुभ मानत नाहीत.असे म्हणतात की या तिथीला वाईट शक्ती सक्रिय होतात. अमावस्येच्या रात्रीचे वर्णन भयंकर रात्र असे केले जाते. पंचांगानुसार, अमावस्या 11 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:05 वाजता समाप्त होईल. या काळात धनु राशीमध्ये अमावस्या दोष आहे. पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांनुसार जेव्हा पत्रिकेत चंद्र आणि सूर्य एकाच भावात बसतात तेव्हा अमावस्या दोष तयार होतो. अमावस्या दोष हा अत्यंत अशुभ योग मानला जातो. अमावस्या योग तयार झाल्यामुळे अनेक राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या कोणत्या राशी आहेत, जाणून घेऊया.

या राशींना राहावे लागेल सावध

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी 10 आणि 11 जानेवारी या दोन दिवशी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल तर सावध राहा. या काळात तुम्ही तंत्रज्ञानाचा भरपूर वापर कराल, पण तुमची महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोचणार नाही आणि लोक त्याचा फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्या. तंत्रज्ञान वापरताना गोपनीयता वैशिष्ट्यांचे गांभीर्याने पालन करा. लोकांची नजर तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर असू शकते, त्यामुळे काम केल्यानंतर ते लॉक केल्याची खात्री करा.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी या काळात कामाचा ताण वाढणार आहे. व्यवसाय करत असाल तर सावधान. तुमच्या अडचणी वाढू शकतात. दिवसभर व्यवसायाच्या तणावाबद्दल तुम्ही विचार करू शकता. व्यवसायात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे या दिवशी हृदय आणि मन संतुलित करणे कठीण होऊ शकते. गोंधळ पसरवणाऱ्यांपासून दूर राहा. कोणाबद्दल वाईट बोलू नका, आपल्या पूर्वजांची आठवण ठेवा आणि त्यांचा आदर करा.

हे सुद्धा वाचा

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी अमावस्या दोष निर्माण झाल्यामुळे व्यावसायिक लोकांसाठी दिवस चांगला राहील, परंतु तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कारण त्यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. तुम्ही खाते तपशील तपासू शकता, तोटा आणि नफा यातील फरक शांतपणे समजून घ्यावा लागेल. रागावू नका, अपशब्द वापरणे टाळा, अन्यथा तुम्हाला अडचणीत येऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड
'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड.
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?.
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या.
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं.
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे.
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'.
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले.
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका.
बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच..
बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच...
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला.