Astro tips : विवाह योग जुळण्यास होत असेल विलंब, तर जोतिषशास्त्रातले हे उपाय अवश्य करा
जोतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या लग्नासाठी योग्य वधू किंवा वर सापडत नसेल, तर लोखंडाच्या पलंगावर कधीही झोपू नका. विवाहयोग्य तरुण-तरुणींनी आपल्या पलंगाखाली कधीही लोखंडी वस्तू ठेवू नयेत आणि स्वच्छतेचीही काळजी घ्यावी.
मुंबई : लग्न जुळण्यासाठी अनेकांना बराच काळ वाट पाहावी लागते. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) पत्रिकेत ग्रहांची स्थिती योग्य नसल्यास विवाह संबंधीत समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील किंवा तुमचे नाते पुन्हा पुन्हा तुटत असेल तर काळजी करू नका. जोतिषशास्त्रामध्ये यासाठी उपाय सांगितले आहेत. असे मानले जाते की या उपायांमुळे विवाह योग गवकर जुळून येतो. याचा अवलंब केल्याने एखाद्याला इच्छित जीवनसाथीही मिळतो. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल.
मंगळ असल्यास होतो लग्नाला विलंब
ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत मंगळ दोष असल्यास विवाहात अडथळे येतात. अशा परिस्थितीत मंगळ दोष दूर करण्यासाठी मंगळवारी उपवास करून हनुमानाची पूजा करावी. यासाठी हनुमानजींना गव्हाचे पीठ आणि गुळाचे लाडू अर्पण करावेत. हनुमानजींना शेंदूर अर्पण करावे आणि हनुमान चालिसाचे पठण करावे.
लवकर लग्न जुळण्यासाठी
लग्नाला विलंब होऊ नये म्हणून शिव पार्वती, राम सीता किंवा कृष्ण राधा यांच्या जोडीची पूजा करावी. विवाह इच्छुकांना दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करावा. यामुळे लग्नाचा योग जुळून येतो.
गुरुवारी करा हे उपाय
ज्योतिषशास्त्रात बृहस्पति हा विवाहाचा मुख्य कारक मानला जातो. गुरूची स्थिती अनुकूल नसल्यास विवाहास विलंब होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घाला. हरभरा डाळ, केळी, हळद आणि केशर यांचे गुरुवारी सेवन केल्यास फायदा होतो. तुम्ही गुरुवारी उपवासही करू शकता.
गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून आंघोळ करा. तसेच पिवळ्या अन्नाचे सेवन करा. असे मानले जाते की यामुळे विवाह योग जुळून येतो. मुलींनी गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी द्यावे. असे केल्याने विवाहाची शक्यता निर्माण होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)