Astro tips : आर्थिक समस्यांचा करत असाल सामना तर अवश्य करा हे ज्योतिषीय उपाय

धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुळशीचे रोप आवडते. त्यामुळे रोज सकाळी उठून स्नान करून, तुळशीला जल अर्पण करून दिवा लावून पूजा केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

Astro tips : आर्थिक समस्यांचा करत असाल सामना तर अवश्य करा हे ज्योतिषीय उपाय
जोतिषशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 7:35 PM

मुंबई : हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार असे म्हटले आहे की जर देवी लक्ष्मी कोणत्याही कारणाने तुमच्यावर कोपली तर तुमच्या जीवनात धनाची कमतरता निर्माण होते. पैशाच्या कमतरतेमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच लोकं नेहमी देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक संकट टाळण्यासाठी कोणते ज्योतिषीय उपाय (Astro Tips) केले पाहिजेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

या उपायांनी होतील आर्थिक तंगी दूर

जर तुम्हाला आर्थिक संकट टाळायचे असेल तर रोज सकाळी देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करा. घरातील पूजास्थानी देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर लाल फुले अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही.

रामाचे आवडते भक्त हनुमानजींची पूजा केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. यासाठी पिंपळाच्या पानावर राम लिहून मंदिरात ठेवा. रामनामाचे पान हनुमानजींच्या पायाजवळ ठेवू नये हे लक्षात ठेवा.

हे सुद्धा वाचा

आर्थिक संकट टाळण्यासाठी सकाळी उठून भक्तीभावाने कनकधारा पाठ केल्यास जीवनात प्रगती होईल आणि जीवनात यश मिळण्याची शक्यता आहे.

धार्मिक मान्यतांनुसार असे मानले जाते की देवी लक्ष्मीला घर आणि दरवाजाची स्वच्छता आवडते. आर्थिक संकट टाळण्यासाठी रोज सकाळी उठून मुख्य दरवाजा आणि घर स्वच्छ करा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, तसेच वास्तुशास्त्रानुसार ते शुभ मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुळशीचे रोप आवडते. त्यामुळे रोज सकाळी उठून स्नान करून, तुळशीला जल अर्पण करून दिवा लावून पूजा केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. नेहमी चिंता राहते. खूप प्रयत्न करुनही तुम्हाला पुरेसे पैसे मिळत नसतील, आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर अपराजिताच्या फुलाचा हा उपाय करा. यासाठी सोमवारी उपवास करुन शिवलिंगाची पूजा करुन अपराजिताची फुले अर्पण करा. यासोबतच रुद्राक्षाच्या मापाने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. त्यानंतर अपराजिताचे फूल उचलून धनाच्या ठिकाणी ठेवावे. तुमच्या आयुष्यात पैशाचा ओघ झपाट्याने वाढेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.