Astro Tips : कर्जाच्या जाळ्यात फसले आहात? मग ज्योतिषशास्त्रातले हे उपाय अवश्य करा
आज वास्तुशास्त्रामध्ये (Astro Tips For Debt Relife) आपण कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघण्याचे उपाय जाणून घेणार आहोत. तुम्हीसुद्धा काही कारणांमुळे कर्ज घेतले असेल आणि आता या कराजाचा डोंगर तुमच्या जीवनातील शांतता भंग करत असेल तर ज्योतिषशास्त्रात यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत.
मुंबई : अनेदा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागते. मात्र बऱ्याचदा आही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास माणूस या कर्जाच्या जाळ्यात खसत जातो. अनेक प्रयत्न करूनही यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नाही. आज वास्तुशास्त्रामध्ये (Astro Tips For Debt Relife) आपण कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघण्याचे उपाय जाणून घेणार आहोत. तुम्हीसुद्धा काही कारणांमुळे कर्ज घेतले असेल आणि आता या कराजाचा डोंगर तुमच्या जीवनातील शांतता भंग करत असेल तर ज्योतिषशास्त्रात यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मंगळवारचा दिवस नेहमीच निवडला पाहिजे. या दिवशी एखाद्याचे पैसे परत केल्यास कर्जातून लवकर सुटका होते.
ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार हे उपाय आहेत अत्यंत प्रभावी
घराच्या दक्षिण-पश्चिम भागात बनवलेले शौचालय देखील व्यक्तीच्या कर्जाचे ओझे वाढवू शकते, त्यामुळे घराच्या या दिशेला शौचालय बनवू नका. याशिवाय घर किंवा दुकानाच्या ईशान्य दिशेला काच लावणे कर्जापासून मुक्त होण्यासाठी चांगले मानले जाते, परंतु काचेची फ्रेम लाल, भगवी किंवा तपकीरी रंगाची नसावी. तसेच, काच जितका हलका आणि मोठा असेल तितका तो तुमच्यासाठी अधिक फायदेशीर असेल.
वास्तूनुसार, घर किंवा दुकानात पाण्याची योग्य व्यवस्था आणि पायऱ्यांची दिशा देखील कर्जापासून मुक्त होण्यास मदत करते. घर किंवा दुकानात पाण्याची व्यवस्था उत्तर दिशेला करावी. या दिशेने पाण्याची व्यवस्था केल्याने कर्जातून लवकर सुटका होते. पाण्याशिवाय घर किंवा दुकानातील पायऱ्यांची योग्य दिशा देखील कर्जमुक्तीसाठी फायदेशीर आहे. जर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या पायऱ्या पश्चिम दिशेला बांधल्या गेल्या असतील किंवा पश्चिम दिशेकडून खाली आल्या तर संपूर्ण कुटुंबाला कर्जाचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे घराच्या पायऱ्या पश्चिम दिशेला नसाव्यात.
कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी बजरंग बाणचा पाठ करावा. या स्तोस्त्राच्या पाठाने कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग दिसतो. व्यक्तीचा मान-सन्मान परत मिळतो तसेच बजरंग बाणचा पाठ करणाऱ्या व्यक्तीभोवती एक सकारात्मक उर्जेचे कवच बनते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)