Astrology 2023 : सिंह राशीत 12 वर्षानंतर ‘पंचग्रही योग’, तीन राशींच्या जातकांना मिळणार ग्रहांची साथ
ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती बदलते आणि युती आघीडी होत असते. त्यामुळे त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. ऑगस्ट महिन्यात असाच ग्रहांचा मेळा सिंह राशीत असणार आहे. त्याचा तीन राशीच्या जातकांना फायदा होईल.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ठराविक वेळेनुसार बदलत असते. त्यामुळे शुभ अशुभ योगांची अनुभूती जातकांना येते. कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थिती आहे यावरून भाकीत वर्तवलं जातं. आता जुलै महिना संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यात पुढच्या महिन्यात ग्रहांची स्थिती कशी असेल याकडे लक्ष लागून आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यात ग्रहांचा मेळा सिंह राशीत लागणार आहे, असं बोललं तर वावगं ठरणार आहे. सिंह ही सूर्याची स्वामित्व असलेली रास आहे. या राशीत 17 ऑगस्टला पंचग्रही योग तयार होत आहे. यात राशीत शुक्र, मंगळ, बुध, रवि आणि चंद्र यांची युती होणार आहे. या ग्रहांच्या युतीचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण तीन राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळणार आहे.
16 ऑगस्टला चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी प्रवेश करेल. सिंह राशीत बुध, शुक्र आणि मंगळासोबत युती होईल. त्यानंतर सूर्यही 17 ऑगस्टला सिंह राशीत येणार आहेत. त्यामुळे पंचग्रही योग जुळून येईल. चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे लक्ष्मी योग जुळून येईल.
तीन राशीच्या जातकांना होणार पंचग्रही योगाचा लाभ
धनु : पंचग्रही योगाचा या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. हा योग या राशीच्या नवम भावात तयार होणार आहे. त्यामुळे नशिबाची चांगली साथ या काळात मिळेल. नवीन भेटीगाठी या काळात होतील. तसेच उद्योगधंद्यात वाढ होईल. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. घरात धार्मिक कार्य पार पडतील. सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल.
मिथुन : या राशीच्या तिसऱ्या स्थानात पंचग्रही योग तयार होत आहे. शौर्य आणि पराक्रमात वाढ होईल. परदेशात व्यापार करणाऱ्या जातकांना या काळात लाभ मिळेल. भावकीच्या वाद निवळेल. तसेच भावंडाची उत्तम साथ या काळात मिळेल. वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील तर त्याही या काळात दूर होतील.
वृषभ : पंचग्रही योग या राशीच्या चतुर्थ स्थानात तयार होत आहे. या काळात भौतिक सुख अनुभवता येतील. गाडी किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. आई वडिलांची उत्तम साथ मिळेल. वडिलोपार्जित जमिनीतून चांगला फायदा होईल. काही जुनी प्रकरणं निकाली लागतील. न्यायलयीन प्रकरणाचा निकाला आपल्या बाजूने लागेल असं ग्रहमान आहे. कला आणि मीडिया क्षेत्राशी निगडीत लोकांना विशेष लाभ मिळेल.