Astrology 2023 : शुक्र ग्रह स्वराशीत प्रवेश करताच तीन राशींना मिळणार नशिबाची साथ, जाणून घ्या

Shukra Gochar 2023 : प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला असतो. गोचराच्या कमी अधिक कालावधीमुळे राशी चक्रावर परिणाम दिसून येतो. वर्षभरानंतर शुक्र ग्रह आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहे.

Astrology 2023 : शुक्र ग्रह स्वराशीत प्रवेश करताच तीन राशींना मिळणार नशिबाची साथ, जाणून घ्या
Astrology 2023 : वर्षभरानंतर शुक्र ग्रह करणार आपल्या उच्च राशीत प्रवेश, तीन राशींना होणार फायदा
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 3:57 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असेल तर भौतिक सुखांची उणीव भासत नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेळ सरण्याच्या आतच भौतिक सुख मिळतं. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीसोबत गोचर कुंडलीकडे जातकांचं लक्ष लागून असतं. सध्या शुक्र ग्रह वक्री असून कर्क राशीत 7 ऑगस्टपासून आहे. आता 2 ऑक्टोबरला शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल. 3 नोव्हेंबरला कन्या राशीत प्रवेश करणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत विराजमान राहील. त्यानंतर स्वरास असलेल्या तूळ राशीत प्रवेश करेल आणि 25 डिसेंबरपर्यंत याच राशीत राहील. त्यामुळे 25 दिवसांचा कालावधी तीन राशीच्या जातकांना अनुकूल राहील. चला जाणून घेऊयात कोणत्या तीन राशींना फायदा होणार ते…

या तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार

तूळ : शुक्राची ही स्वरास आहे. या राशीत गोचर करताच शुक्राची शुभं फळ अनुभवायला मिळतील. या काळात तुम्हाला धन आणि वैभव प्राप्त होण्यासारखं ग्रहमान आहे. तुमचा समाजान मानसन्मान वाढेल. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. उत्पन्नात वाढ होईल. तसेच कुटुंबात वातावरण चांगलं राहील. मित्रमंडळीकडूंन उत्तम साथ लाभेल. भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. भौतिक सुखांची अनुभूती घेत असताना आपल्यामुळे कोण दुखावेल असं वागू नका. तसेच वडिलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवा.

कुंभ : या राशीत शनिदेव विराजमान आहे. त्यात शुक्र नवव्या स्थानात येणार असल्याने नशिबाची उत्तम साथ लाभेल. शुक्र आणि शनि यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध आहे. त्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगती दिसून येईल. तसेच मुलांच्या अभ्यासातील चढता आलेख पाहून आनंदी व्हाल. त्याचबरोबर आध्यात्माममध्ये आवड निर्माण होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. देश विदेशात यात्रा करण्याचा योग जुळून येईल.

कर्क : शुक्र ग्रह या राशीच्या चतुर्थ स्थानात गोचर करणार आहे. यामुळे वाहन आणि प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. या कालावधीत महागडी वस्तू खरेदी करू शकता. विशेष म्हणजे शुक्राची दृष्टी आपल्या राशीच्या दशम स्थानावर पडत आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टी, प्रॉपर्टी, अभिनय, मीडिया आणि ग्लॅमर जगताशी निगडीत लोकांना फायदा होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. नकाराचं रुपांतर होकारात होऊ शकते, असं ग्रहमान आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.