Budhaditya 2023 : शुक्राच्या राशीत सूर्य आणि बुधाची होणार युती, राशीचक्रातील तीन राशींना मिळणार नवे आर्थिक स्रोत

Astrology 2023 : ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि बुधाची युती शुभ मानली जाते. बुध हा सूर्याच्या जवळचा ग्रह असल्याने ही युती आघाडी होत असते. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येतो.

Budhaditya 2023 : शुक्राच्या राशीत सूर्य आणि बुधाची होणार युती, राशीचक्रातील तीन राशींना मिळणार नवे आर्थिक स्रोत
Budhaditya 2023 : सूर्य आणि बुध ग्रह पुन्हा येणार एकत्र, तीन राशींवर दिसेल सकारात्मक प्रभाव
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 6:27 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. एका ठरावीक कालावधीनंतर ग्रह राशी बदल करतात. चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदल करतो. त्यानंतर सूर्याजवळ असलेल्या बुध ग्रहाचा क्रमांक येतो. सूर्याजवळ असल्याने बुधाचं अस्त आणि उदयाला येण्याचं प्रमाणही जास्त आहे. आता सूर्य आणि बुध ग्रह पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. एका वर्षानतर सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या स्थितीला तूळ संक्रांती असं म्हटलं जातं. 11 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करताच हा योग जुळून येणार आहे. तसेच केतु ग्रह हा 30 ऑक्टोबरपर्यंत असल्याने थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. तीन राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येईल. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ होईल ते…

या तीन राशींच्या जातकांना होईल फायदा

कन्या : या राशीच्या जातकांना सूर्य आणि बुधाची स्थिती फायदेशीर ठरेल. कारण हा योग धन स्थानात होणार आहे. या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या कामात तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल. हातात घेतलेली कामं पूर्ण होत असल्याने तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण जितकी कामं पूर्ण करता येतील तितकी करण्याचा प्रयत्न करा. आपल्या माध्यमातून कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. मार्केटिंग, मीडिया क्षेत्राशी निगडीत लोकांना फायदा होईल.

धनु : या राशीच्या उत्पन्न स्थानात बुधादित्य योग तयार होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल. तुम्ही घेतलेली उसनवारी या काळात फेडून टाका. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. लॉटरी किंवा शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायासाठी प्लानिंग करा आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करा. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. पत्नीसोबत छोटेमोठे वाद असतील तर ते दूर करा. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल.

मकर : या राशीच्या कर्म स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. त्यामुळे कामात तुम्हाला चांगल्या घडामोडी घडताना दिसतील. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अंमलबजावणी होईल. पार्टनरशिपच्या धंद्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. प्रवासाचा योग जुळून येईल. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तसेच आपल्या वागण्याचा कोणाला राग येणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.