Astrology 2023 : सूर्य गोचरामुळे कर्क राशीत तयार होणार बुधादित्य योग, चार राशींना रविबळ

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळात सूर्यदेवांना राजाचा दर्जा देण्यात आला आहे. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह डोळ्यांना दिसणार आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम मानवी जीवनावर लगेच दिसून येतो.

Astrology 2023 : सूर्य गोचरामुळे कर्क राशीत तयार होणार बुधादित्य योग, चार राशींना रविबळ
सूर्य आणि बुधाची कर्क राशीत होणार युती, शुभ योगाचा चार राशींवर होणार सकारात्मक परिणाम
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 12:05 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका कालावधीनंतर राशीबदल करत असतो. सूर्यदेव महिनाभरानंतर राशीबदल करतात. या राशीबदलानुसार सूर्यराशी ठरवल्या जातात. पण भारतीय ज्योतिषशास्त्रात चंद्राच्या स्थितीवरून रास ठरवली जाते. पण सूर्याचं गोचर राशीचक्रावर बराच परिणाम करून जातो. सूर्याच्या गोचराला संक्रांती म्हंटलं जातं. सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार असल्याने कर्क संक्रांती असं संबोधलं जातं. सूर्य 16 जुलैला एक महिन्यासाठी कर्क राशीत विराजमान होणार आहे. या राशीत आधीच बुध ग्रह स्थित असल्याने शुभ असा बुधादित्य योग तयार होणार आहे. यामुळे चार राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

या राशींना मिळणार लाभ

मेष : या राशीवर सूर्याची कृपा असणार आहे. महिनाभर या राशींवर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. चांगल्या घडामोडी या काळात घडतील. काही अशक्यप्राय गोष्टी सहज शक्य झाल्याने आश्चर्य वाटेल. आत्मविश्वास दुणावल्याने काही जबाबदाऱ्याही अंगावर पडतील. ती कामंही तु्म्ही सहजपणे कराल असं रविबळ आहे. विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांमध्ये चांगलं यश मिळेल.

कर्क : या राशीतच सूर्यदेव महिनाभरासाठी विराजमान होणार आहेत. जीवनातील प्रतिकूल परिस्थितीवर सूर्यामुळे मात करता येईल. गेल्या काही दिवसांपासून असलेली अडचण दूर कराल. आरोग्या विषयक तक्रारी दूर होतील. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली स्थळं चालून येतील.

कन्या : सूर्याच्या गोचरामुळे आर्थिक गुंता हळूहळू सुटण्यास मदत होईल. व्यवसायिक जातकांना चांगला लाभ मिळेल. तसेच कमाईचे नवे मार्ग खुले होतील. नव्या मित्रमंडळीमुळे उत्साहाने काम कराल. गुंतवणुकीतून चांगला लाभ या काळात मिळू शकतो. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. तसेच किचकट विषय समजण्यात मदत होईल.

तूळ : या राशीच्या जातकांना बऱ्याच कालावधीनंतर सूर्याचं पाठबळ मिळणार आहे. पगारवाढ या काळात होऊ शकते किंवा इन्सेटिंव्ह पदरी पडू शकतात. आत्मविश्वासात वाढ होईल. तसेचं कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून खराब झालेले संबंध सुधारतील. आरोग्यविषयक तक्रारी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुढच्या शिक्षणासाठी पाऊल उचलण्याची विद्यार्थ्यांना योग्य वेळ असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.