Chandal Yog : 21 जून रोजी चांडाळ योग होणार भंग, पाच राशींचं नशिब फळफळणार

मेष राशीत चांडाळ योग सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये वाईट घटनांमध्ये वाढ झाली आहे. असं असताना 21 जूनपासून चांडाळ योग भंग पावणार आहे. कसं ते समजून घ्या

Chandal Yog : 21 जून रोजी चांडाळ योग होणार भंग, पाच राशींचं नशिब फळफळणार
Chandal Yog : चांडाळ योगातून पाच राशींना मिळणार दिलासा, 21 जून रोजी राशीचक्रात घडणार असं काही
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 8:35 PM

मुंबई : राशीचक्रात दररोज बऱ्याच घडामोडी घडत असतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करताना शुभ अशुभ योग घडून येतात. सध्या मेष राशीत गुरु आणि राहुची युती झाली आहे. ज्योतिषशास्त्रात हा सर्वात अशुभ योग मानला जातो. या युतीचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर गंभीर परिणाम दिसून येत आहे. मात्र असताना गुरु राहु युतीमुळे निर्माण झालेला चांडाळ योग 21 जून रोजी भंग पावणार आहे. कारण देवगुरू बृहस्पती अश्विनी नक्षत्रातून भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर राहु ग्रह अश्विनी नक्षत्रातच असणार आहे. यामुळे राहु गुरु चांडाळ योग भंग पावणार आहे. यामुळे काही राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या त्या…

या राशींना होणार फायदा

मिथुन : या राशीच्या जातकांना चांडाळ योग भंग झाल्याने फायदा होणार आहे. कारण चांडाळ योगामुळे होणाऱ्या कामात अडसर येतो. हा योग भंग पावल्यानंतर या जातकांच्या कुंडलीत दोन राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे दुहेरी फायदा होणार आहे. बुधादित्य आणि भद्र राजयोगामुळे जातकांना लाभ मिळणार आहे. न झालेली कामं पूर्ण होतील. तसेच नवीन आर्थिक स्रोत निर्माण होतील. समाजात मानसन्मान वाढेल.

कर्क : या राशीच्या जातकांनाही चांडाळ योग भंग पावल्याने दिलासा मिळणार आहे. समाजात तुम्हाला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराची साथ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल.

सिंह : या राशीच्या जातकांनाही आर्थिक लाभ होईल. सध्या गुरु ग्रह नवव्या स्थानात असल्याने नशिबाची चांगली साथ मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. काही गोष्टी अचानक घडल्याने आश्चर्याचा धक्का बसेल. आई वडिलांची साथ मिळेल. नवीन व्यवसाय या काळात सुरु करू शकता.

धनु : गेल्या काही दिवसांपासून घरात सुरु असलेले वाद शमणार आहेत. गुरु ग्रह पंचम स्थानात असल्याने मुलं, शिक्षण, प्रेम संबंध आणि बौद्धिक पातळीवर सुधारणा दिसणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. काही ठिकाणी सल्ला घेऊन गुंतवणूक करा. यामुळे भविष्यात लाभ मिळू शकतो. व्यवसाय सुरु करण्यासाठी योजना आखा.

मकर : या राशीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रात जबरदस्त लाभ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन संधी मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची संधी चालून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाने इतर सहकारी प्रभावित होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.