Astrology 2023: शनि राहुच्या अशुभ युतीमुळे तीन राशींचे धाबे दणाणणार, दोन महिने नकोसे होणार
ज्योतिषशास्त्रात ग्रहांची वर्गवारी शुभ आणि पापग्रह अशी करण्यात आली आहे. शनि आणि राहुची युती तीन राशींच्या डोक्याला ताप ठरणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. ग्रहांची वर्गवारी शुभ आणि पापग्रह अशी करण्यात आली आहे. राहु आणि शनि हे पापग्रह आहेत. त्यामुळे हे दोन ग्रह एकत्र आले की राशीचक्रात मोठी उलथापालथ दिसून येते. शनिला न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे वाईट कृत्यांना जराही थारा न देता दंड ठोठावतात. राहु आपल्या मायाजाळात जातकांना फार गुंतवून सोडतात. त्यामुळे राहु आणि शनि ग्रहाची युती काही राशीच्या जातकांना चांगलीच महागात पडणार आहे. शनि 17 ऑक्टोबरपर्यंत शतभिषा नक्षत्रात असणार आहे. राहु आणि शनिच्या युतीमुळे तीन राशीच्या जातकांना 17 ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहावं लागणार आहे.
राहु-शनिच्या युतीमुळे या राशींच्या जातकांची डोकेदुखी वाढणार
कर्क : कर्क राशीच्या जातकांना सध्या शनिची अडीचकी सुरु आहे. त्यात राहु आणि शनिच्या युतीमुळे नकारात्मक प्रभाव पडेल. त्यामुले या राशीच्या जातकांना कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागेल. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सावध राहा. 17 ऑक्टोबरपर्यंत सावध राहा आणि आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. इतकंच काय तर मानसिक त्रासाला समोरं जावं लागेल.
कुंभ : शनिची ही स्वरास असून सध्या शनिदेव याच राशीत विराजमान आहेत. शनि साडेसातीचा मधला टप्पा सध्या सुरु आहे. त्यात शनि आणि राहुची शतभिषा नक्षत्रात युती होणार आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात बऱ्याच नकारात्मक घडामोडी घडतील. कदाचित मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो.
कन्या : शतभिषा नक्षत्रात शनि आणि राहुची युती होत आहे. या राशीच्या जातकांना या काळ खूपच कठीण जाणार आहे. अतिरिक्त खर्चात वाढ होईल. इतकंच काय तर उसनवारी करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे विनाकारण होणारा खर्च टाळा. तसेच जितकी काटकसर करता येईल तितकी करा. कोणालाही शब्द देऊन उगाचच अडचणीत येऊ नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)