Ketu 2023 : मायावी केतु ग्रह कन्या राशीत करणार प्रवेश, 3 राशीच्या जातकांना होणार फायदा

राहु केतु हे मायावी ग्रह आहे. त्यामुळे यांना पापग्रहांचा दर्जा देण्यात आला आहे. पण कधी कधी पापग्रह चांगली फळंही देतात. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींवर केतुची कृपा असेल.

Ketu 2023 : मायावी केतु ग्रह कन्या राशीत करणार प्रवेश, 3 राशीच्या जातकांना होणार फायदा
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 1:13 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. केतु हा राहुसारखाच मायावी ग्रह आहे. पण राहुप्रमाणे केतुला कोणत्याच राशीचं स्वामित्त्व नाही. ज्योतिषांनुसार केतु हा मंगळाप्रमाणे फळ देणारा ग्रह आहे. अर्थात तुमच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असेल तर केतु चांगली फळं देतो. केतु आणि राहु हे दोन्ही ग्रह राशी चक्रात उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात हे विशेष. दुसरं म्हणजे एकाच वेळेला हे दोन्ही ग्रह दीड वर्षांसाठी एका राशीत ठाण मांडतात. या दोन्ही ग्रहांची कधीच युती होत नाही आणि होऊ शकत नाही.

केतु ग्रह 30 ऑक्टोबर 2023 रोजी तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. हा प्रवेश करताच तीन राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या नशिबवान राशींबाबत

मेष : केतु या राशीच्या गोचर कुंडलीतील सहाव्या स्थानात असणार आहे. हे स्थान रोग, कर्ज आणि शत्रूंबाबत सांगते. या स्थानात विराजमान असलेल्या केतुची नजर दहाव्या, बाराव्या आणि दुसऱ्या स्थानावर असेल. नोकरीत तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम दिसतील. परदेशवारी घडण्याची शक्यता देखील या काळात आहे.

वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंदाचे क्षण उपभोगता येतील. पत्नीची तब्येत ठणठणीत राहील. शत्रूपक्षावर विजय मिळवण्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच या काळात नव्या कामाला सुरुवात करू शकता.

कर्क : केतु या राशीच्या तिसऱ्या स्थानात गोचर करत आहे. हे स्थान संवाद, भाऊ, साहस, लेखन आणि प्रवासाशी निगडीत आहे. या स्थानातून केतु सप्तम, नवम आणि एकादश भावावर नजर ठेवेल. यामुळे तुमच्या भावंडांना चांगलं यश मिळताना दिसेल. जमिनीशी वाद संपुष्टात येतील.

गोचर कालावधीतील प्रवास फलदायी ठरणार आहे. तसेच अडकलेली कामंही पूर्ण होतील. पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस या काळात सुरु करू शकता. व्यवसायिकांसाठी हे गोचर चांगलं ठरेल.

वृश्चिक : या राशीच्या एकादश भावात केतु गोचर करत आहे. या स्थानाला उत्पन्नाचं स्थान म्हंटलं आहे. या स्थानातून केतुची दृष्टी तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या स्थानावर असेल. त्यामुळे या काळात तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल. अतिरिक्त कामामुळे थोडा ताण वाढेल पण आर्थिक स्थिती सुधारेल.

नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. त्याचबरोबर पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. वाणीवर नियंत्रण ठेवा तसेच केतुमुळे तुम्हाला बोलताना बऱ्याच गोष्टी क्लिक होत जातील त्यामुळे फायदा होईल. या काळात मोठी लक्ष्य गाठू शकता.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती उपलब्ध स्रोतावर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.