Astrology 2023 : 25 मे रोजी गुरुपुष्यामृत आणि लक्ष्मीयोग एकत्र; जाणून घ्या राशीभविष्य, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

मेष राशीत गुरु चांडाळ योग असला तरी काही राशींमध्ये शुभ योगांची स्थिती आहे. त्यात काही योग एकत्र जुळून येत असल्याने जातकांना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Astrology 2023 : 25 मे रोजी गुरुपुष्यामृत आणि लक्ष्मीयोग एकत्र; जाणून घ्या राशीभविष्य, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Astrology 2023 : गुरुपुष्यामृत आणि लक्ष्मीयोगाचं अनोखा मिलाफ, मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 3:11 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, काही ग्रह आणि नक्षत्रांची एकत्र सांगड झाली की शुभ अशुभ योग जुळून येतात. ग्रहांच्या आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे असेच दोन शुभ योग घडणार आहे. त्यामुळे जातकांना त्याचा फायदा होणार आहे. 25 मे रोजी गुरुपुष्यामृत आणि लक्ष्मी योग जुळून येणार आहे. हे दोन योग एकत्र येणं खूपच दुर्मिळ आहे. त्यामुळे काही जातकांना या स्थितीचा लाभ मिळणार आहे. पुष्य नक्षत्र गुरुवारी असल्याने गुरुपुष्यामृत योग, तर मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे लक्ष्मी योग जुळून येणार आहे.

लक्ष्मी योग

मंगळ ग्रह 10 मे रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दुपारी 1 वाजून 44 मिनिटांनी राशी परिवर्तन होणार आहे. मंगळ ग्रह या राशीत 1 जुलैपर्यंत राहणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा चंद्राचं गोचर या राशीत होईल तेव्हा लक्ष्मी योग जुळून येईल. चंद्र 24 मे रोजी सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत 26 मे पर्यंत रात्री 8 वाजून 49 मिनिटांपर्यंत राहील. सव्वा दोन दिवस लक्ष्मी योग असेल.

गुरुपुष्यामृत योग

पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं. या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा अशी उपाधी देण्यात आली आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 27 नक्षत्रांपैकी 8 व्या स्थानी पुष्य नक्षत्र आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्रात आल्यास गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुपुष्यामृत योग 25 मे 2023 रोजी सखाली 6 वाजून 4 मिनिटांपासून संध्याकाळी 5 वाजून 52 मिनिटांपर्यंत असणार आहेय

गुरुपुष्यामृत योगात भविष्याच्या दृष्टीकोनातून लवकर बदल होऊ नये अशी कामं केली जातात. गुरुपुष्यामृत योगात सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. कारण सोन्याला शुद्ध, पवित्र आणि अक्षय धातू असं मानलं जातं. त्यामुळे या नक्षत्रात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.

या राशीच्या जातकांना होईल फायदा

कन्या : लक्ष्मी योग या जातकांच्या एकादश भावात तयार होत आहे. हे स्थान उत्पन्न आणि लाभाचं स्थान आहे. त्यामुळे या स्थानात लक्ष्मी योग जुळून येत असल्याने जातकांना फायदा होईल. उत्पन्नात वाढ होईल तसेच नवे आर्थिक मार्ग खुले होतील. या स्थितीचा जातकांवर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

तूळ  : लक्ष्मी योग या जातकांच्या दशम स्थानात तयार होत आहे. हे स्थान करिअर आणि नोकरीचं स्थान आहे. त्यामुळे या काळात करिअरमध्ये काही सकारात्मक बदल दिसून येतील. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

मिथुन : या राशीच्या द्वितीय स्थानात लक्ष्मी योग तयार होत आहे. हे स्थान धन आणि परिवाराशी निगडीत असतं. त्यामुळे जातकाला अचानक धनलाभ होऊ शकतो. लॉटरी किंवा शेअर बाजारातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील आणि तुमच्या कामाला प्रोत्साहन मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.