Astrology 2023 : गुरुपुष्यामृत योग आणि देवगुरु बृहस्पतीचा उदय, या राशींचं नशीब पालटणार

ज्योतिषशास्त्रात गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहाच्या स्थितीवर शुभ कार्य आणि इतर गोष्टी अवलंबून असतात. सध्या गुरु ग्रह अस्ताला असून मेष राशीच गोचर केलं आहे. आता खास नक्षत्रात गुरु ग्रहाचा उदय होणार आहे.

Astrology 2023 : गुरुपुष्यामृत योग आणि देवगुरु बृहस्पतीचा उदय, या राशींचं नशीब पालटणार
गुरुपुष्यामृत योग आणि गुरु ग्रहाला मिळणार तेज, या राशींना होणार जबरदस्त फायदा
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 1:41 PM

मुंबई : देवगुरु बृहस्पती मीन राशीत असताना अस्ताला गेला होता. त्यानंतर अशाच स्थितीत मेष राशीत 22 एप्रिल 2023 रोजी प्रवेश केला आहे. गुरु ग्रह अस्ताला असल्याने शुभ कार्य वर्जित असतात. 27 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. या दिवशी खास नक्षत्र म्हणजेच पुष्य नक्षत्र आहे. गुरु पुष्य नक्षत्र योग 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजता सुरु होईल आणि 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6 वाजून 7 मिनिटांपर्यंत राहील. या सोबत शनि आपल्या कुंभ राशीत, चंद्र कर्क राशीत आणि सूर्य आपल्या उच्च राशी असलेल्या मेष राशीत असणार आहे. त्यामुळे या स्थितीचा काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.

पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं. या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा अशी उपाधी देण्यात आली आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 27 नक्षत्रांपैकी 8 व्या स्थानी पुष्य नक्षत्र आहे. गुरुपुष्यामृत योगात सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. कारण सोन्याला शुद्ध, पवित्र आणि अक्षय धातू असं मानलं जातं. त्यामुळे या नक्षत्रात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.

या चार राशींना होणार फायदा

मेष : या राशीच्या लग्नभावात गुरु ग्रहाचा उदय होणआर आहे. त्यामुळे जातकांना जबरदस्त फायदा होईल. कामाच्या ठिकाणी याची प्रचिती दिसून येईल. सहकाऱ्यांकडून कामात चांगलं सहकार्य मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. नोकरी बदलण्यासाठी ही वेळ चांगली आहे. त्याचबरोबर या काळात शुभ कार्य करता येतील.

तूळ : या राशीच्या सातव्या स्थानात गुरु ग्रहाचा उदय होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना नोकरी, व्यवसायात चांगलं यश मिळेल. प्रेम प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तसेच जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील. त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

धनु : या राशीच्या पाचव्या स्थानात गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये नव्या संधी चालून येतील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकेत. व्यवसायासाठी ही योग्य वेळ आहे. जुन्या आजारातून या काळात दिलासा मिळू शकतो. जुने मित्र किंवा नातेवाईकांची या काळात भेटीगाठी होतील.

मकर : या राशीच्या चौथ्या स्थानात गुरु ग्रह उदीत होणार आहे. भौतिक सुख आणि संपत्तीचं हे स्थान आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्याचबरोबर भावाबहिणीची तुम्हाला चांगली साथ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.