Astrology 2023 : जुलै महिन्यात चार मोठे ग्रह बदलणार रास, या राशींना होणार फायदा

जुलै 2023 या महिन्यात चार मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. यामुळे राशीचक्रावर शुभ अशुभ परिणाम दिसून येईल. तीन राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळेल.

Astrology 2023 : जुलै महिन्यात चार मोठे ग्रह बदलणार रास, या राशींना होणार फायदा
Astrology 2023 : जुलै महिन्यात चार ग्रहांची उलथापालथ, राशीचक्रातील तीन राशींना मिळणार लाभ
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 5:08 PM

मुंबई : जून महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण आतापासून पुढच्या महिन्याची गणितं सुरू झाली आहेत. आर्थित स्थिती आणि इतर बाबींसाठी व्यवस्थापन सुरु झालं आहे. असं असताना ग्रहांची साथ किती लाभणार याकडेही जातकांचं लक्ष लागून आहे. जुलै महिन्यात चार मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. यामध्ये मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य या ग्रहांचा समावश आहे. तर चंद्र हा ग्रह दर सव्वा दोन दिवसांनी राशीबदल करत राहणार आहे. त्यामुळे शुभ अशुभ योग जुळून येणार आहेत. चार मोठ्या ग्रहांच्या बदलाचा काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. चला जाणून कोणता ग्रह कसा बदल करेल आणि कोणत्या राशींना लाभ होईल.

ग्रहांचा सेनापती असलेला मंगळ ग्रह 1 जुलै 2023 रोजी रात्री 2 वाजून 37 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह 7 जुलै 2023 रोजी पहाटे 4 वाजून 28 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. यामुळे सिंह राशीत लग्न भंग योग तयार होणार आहे.

बुध ग्रह 8 जुलै 2023 रोजी रात्री 12 वाजून 19 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल. अस्ताला गेलेल्या बुध ग्रहाचा 14 जुलै 2023 रोजी उदय होईल आणि प्रगतीची नवी दारं उघडतील. 17 जुलै 2023 रोजी सूर्यदेव सकाळी 5 वाजून 19 मिनिटांनी कर्क राशीत गोचर करेल. यामुळे बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल.

25 जुलै 2023 रोजी बुध ग्रह सकाळी 4 वाजून 38 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. यामुळे सिंह राशीत शुक्र, मंगळ आणि बुधाच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होईल. 23 जुलै 2023 रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहे.

ग्रहांच्या उलथापालथीमुळे राशीचक्रातील तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. यात मेष, सिंह आणि तूळ राशीचा समावशे आहे. कारण या राशीच्या एकादश, दशम, नवम आणि लग्न भावात ग्रहांचं भ्रमण आणि युती होणार आहे. या काळात राशीच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच नवे आर्थिक स्रोत निर्माण होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.